
जमिनीवरचा माणूस : वर्ध्यातील पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे साधेपण ठरले आदर्श”
जमिनीवरचा माणूस : वर्ध्यातील पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे साधेपण ठरले आदर्श”
वर्धा(प्रतिनिधी)
माणूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला, तरी जर त्याच्या डोक्यात पद किंवा अधिकार गेले नाहीत, तर त्याचा बहुमान हा अमूल्य ठरतो. वर्ध्यात कार्यरत पोलिस अधिक्षक अनुरागजी जैन हे याचे जिवंत उदाहरण ठरले आहेत.अचानक मनात आले तसे मुलाला घेऊन साहेब बाईकवरून देवीदर्शनासाठी निघाले. साधे कपडे, सोबत लहान मुलगा, कुठेही एसपींचा आविर्भाव नाही, पोलिसांच्या गाड्यांचा ताफा नाही. अनेकांना तर ओळखही पटली नाही. यालाच म्हणतात “जमिनीवरचा माणूस”.अत्यंत साधेपणा आणि योग्य पोलिसिंगमुळे वर्धा जिल्हा आज शांत आहे. कुणाच्या पाच पैशाला लाजिम नसलेल्या अधिकाऱ्याला काय कुणाची भीती? साहेबांच्या या वागण्यामुळे मात्र यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.पूर्वी वर्धा पोलिस यंत्रणा जणू औरंग्याची फौज बनली होती. कायद्याची ऐशी-तैशी करून, कारवायांच्या नावाखाली पैसा कमाविण्याचा नाद, लोकांना मूर्ख समजणाऱ्या प्रवृत्ती आज जमिनीवर उतरल्या आहेत. फुगा फुगल्यावर फुटतोच आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला शेवटी मिळतोच बहुमान.आज वर्धा पोलिस यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या साधेपणाने आणि कर्तव्यपरायणतेने पोलिसांमध्येच धास्ती भरली असून, सामान्य माणूस अधिक्षक म्हणून काम करतो आहे, ही वर्ध्यासाठी नक्कीच गर्वाची बाब आहे.