
पंकज भोयर तिसऱ्या क्रमांकावर जाणार रामनगर लीज प्रकरणी भांडाफोड राजकीय समीकरणात बदल.
पंकज भोयर तिसऱ्या क्रमांकावर जाणार रामनगर लीज प्रकरणी भांडाफोड राजकीय समीकरणात बदल.
वर्धा (जिल्हा प्रतिनिधी) मागील दोन पंचवार्षिक निवडणुका जिंकणारे आमदार पंकज भोयर यावेळी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 20 कोटी रुपये निवडणुकीवर खर्च करणारे आमदार पंकज भोयर यावेळी निवडणूक जिंकणार नाही असे संकेत दर्शवितात. पंकज भोयर यांच्या कार्यकाळात अनेक पोस्टरछाप कामे जनतेला दिसून पडले. कोणतेही कामे पूर्णत्वास गेले नाही. अशी जनतेची ओरड आहे. यांच्या कार्यकाळात भुयारी गटार योजना दहा वर्षे रस्ते खोदून पूर्णत्वास गेली नाही. मागील दहा वर्षापासून बजाज चौकातील एक फुल सुद्धा साधा झाला नाही. खासदार आणि आमदार भाजपचे असताना सुद्धा बजाज चौकातील पूर्ण पुलाचे काम पूर्ण जाऊ शकले नाही. याव्यतिरिक्त रामनगर परिसरातील लीज हा मुद्दा केवळ जनतेला मूर्ख बनवणारा ठरला असून या प्रकरणात आता रामनगर परिसरातील जनता आपले घर विकू सुद्धा शकत नाही बांधकाम सुद्धा करू शकणार नाही लिजचे नूत्रीकरण सुद्धा वेळोवेळी करावे लागणार अशा समस्या धडकल्या मात्र दुसरीकडे उदो उदो करणारे कार्यक्रम करून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम आमदार यांनी केल्याचे जनता ओरडत आहे. रामनगर परिसरातील 30000 मतदारांनी भारतीय जनता पार्टीकडे पाठ फिरवली असून रामनगर येथील किमान दहा हजार मतदारांनी सुद्धा भोयर यांना मतदान दिले नाहीत तरी भोयर यांचा डोंगा बसल्याशिवाय राहणार नाही. असे स्पष्ट संकेत रामनगर परिसरातून मिळत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मताचे विभाजन होत असुन कुणबी मतदारांचा कल सचिन पावडे यांच्या कडे दिसून येतो.तर वांडेकर कुनब्यांचा सरसकट गोतावळा शेखर शेंडे यांच्या बाजूला दिसत असल्याचे चित्र आहे. भोयर यांच्यावर असलेली प्रचंड मतदारांची नाराजी यावेळी त्यांना चांगलीच भोवणार असे चित्र आहे.