वर्धा येथिल बिल्डर संघटनेत असंतोष..? संघटनेचे निघाले वाभाडे

वर्धा येथिल बिल्डर संघटनेत असंतोष..?
संघटनेचे निघाले वाभाडे.

वर्धा(मंगेश चोरे) वर्धा येथिल बिल्डर लोकांनी उभारलेल्या क्रीडा इ या अनधिकृत संघटनेतील अंतर्गत वाद रस्त्यावर आल्याने. वर्धेतील अनेक लेआऊट असे आणि कुणाच्या आशीर्वादाने अवैध रित्या मंजुर झालेत.आता अनेक ठिकाणी मोठाली घरे उभे झालेत.मात्र अंतर्गत विषय जर पुढे आले तर काय होणार ? आणि यात कुणाचे नुकसान होणार ? हे मोठे प्रश्न उपस्थित होणार की काय. याची भीती या अंतर्गत वादाने निर्माण झाली आहे. मागिल अकरा वर्षापासून ही संघटना काम करीत आहे.मात्र कुठेही अधिकृत रजिस्ट्रेशन(नोंदणी) नाही. दर वर्षी यात सभासद असलेल्या किमान साठ लोकांकडुन प्रती वर्षाला अकरा हजार मोजुन द्यावे लागते.या अकरा वर्षात याचे प्रमुख पद मात्र चार पाच त्याच चांडाळ चौकटी कडे राहिले.यांना गरीब किंवा इतर माणूस चालत नाही.यांच्या मधात जर कोणी बोलले तर हे त्याला अपमानित करतात. असे यातील त्रस्त लोकांनी व्यक्त केले.इतकेच नव्हे तर यातील अनेक विषय पुढे आणले.आजवर या संघटनेत किमान कोटी रुपयाची इनकमिंग झाली. मग हा पैसा कुणाकडे जमा आहे.ही संघटना कशाला? केवळ काही अडचणी आल्यात तर एकत्रित अधिकाऱ्याकडे जाऊन.मी अध्यक्ष,मी आलना मी फालाना असे सांगुन केवळ त्या अधिकाऱ्याला धारेवर धरून आपले काम काढणे हाच आहे. ही संघटना बोगस आहे.यात काहीही शंका नाही.याचे आजवर कुठेही अधिकृत ऑडिट, झालेले नाही.नाव तर असे की ही क्रीडा संघटना आहे मात्र तसेही नाही.क्रीडा इ मंजे Confederation of Real Estate Developers Association of India.याचा अर्थ बांधकाम करणाऱ्या लोकांची संघटना. ही संघटना ठीक ठिकाणी आहे परंतु प्रत्यक जिल्ह्यात रजिस्टर आहे केवळ वर्धा येथेच रजिस्टर नाही.येथे अनाधिकृत संघटना आहे. शासनाशी कुठेही रजिस्टर नसलेली संघटना. आता या संघटनेत झाला वांदा झाला.आता काय पुढे येणार वाचा …क्रमाश


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles