मित्रांनो, भगिनींनो आणि बंधूंनो, वाचा आणि विचार करा …….

मित्रांनो, भगिनींनो आणि बंधूंनो, वाचा आणि विचार करा …….

मी मंगेश चोरे… आपण मला गेल्या तेवीस वर्षांपासून वर्धा येथे पत्रकार म्हणून बघत आहात. मी स्वर्गीय प्रमोद बाबू शेंडे कृषी मंत्री झाले त्या दिवशीपासून दादाच्या सानिध्यात आलो. त्या दिवशीपासून राजकीय नेते जवळून पाहिले — स्वर्गीय प्रमोद बाबू शेंडे, स्वर्गीय प्रभाताई राव, स्वर्गीय वसंतराव वानखेडे, शरदराव काळे. नंतर दत्ताजी मेघे आले. त्यांचे पॉलिटेक्निक कॉलेज आले, मग दवाखाना आला. मेघे साहेब वर्धेत राजकारणात सक्रिय झाले.त्या वेळी आम्ही स्वर्गीय पी. के. मदनकर यांच्या महासागर पेपरमध्ये, ‘रिल’ कॅमेऱ्यात फोटो काढायचो. सांगायचे तात्पर्य म्हणजे — त्यावेळी राजकारण हे आजच्या पेक्षा काहीसे वेगळेच होते.पत्रकारिता देखील निराळीच होती. त्या वेळी राजकारणातही पहेलवान होते आणि पत्रकारितेतही. मुळात आम्ही राजकारणी नाहीच; पण माननीय प्रदीपसिंह ठाकूर यांच्या काळात सलग पाच वर्ष युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होतो. ज्यांच्या नियुक्त्या आम्ही आमच्या हाताने लिहिल्या — ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. पाणठेल्यावर सिगारेट ओढणारे कित्येक जण आज मोठ्या पदांवर आहेत.
याचा अर्थ आम्ही काहीच केले नाही, असे होत नाही. आज आणि काल यामध्ये खूप मोठा फरक आहे. ज्याने काल पाहिला त्याला आजची पूर्वकल्पना कालच होते. म्हणून आजपेक्षा काल महत्त्वाचा असतो. कालच्या राजकारण्यांनी आजचे भविष्य घडवले होते. पुढचा राजकारणी हा आजच्या सारखा नसेल — आणि तसेच झाले.
पूर्वी राजकारणी समोरासमोर दोन हात करायचे; आज मात्र हात दुसऱ्यांचे वापरतात. पूर्वी अपेक्षा नव्हत्या, स्वार्थ नव्हता. आज कोट्यवधी मिळाले तरी समाधान नाही ही वस्तुस्थिती आहे.आम्ही केवळ पत्रकारिता जोपासली, राजकारण नाही. आणि आज पत्रकारिता ही देखील पक्षीय झाली आहे. त्यामुळे ‘नारद’ची भूमिका हळूहळू संपू लागली आहे. ज्या दिवशी नारद यांनी आपली भूमिका सोडली आणि एखाद्या पक्षाला जोडले — त्या दिवशी या जगात राक्षसांचे राज्य स्थापन होईल, यात शंका नाही.
मित्रांनो, आज लोकांनी देव सोडला आहे. धर्म कधी बदलतील याचा नेम नाही. हे अधोगतीचेच लक्षण आहे. मी आजही अनुभवतो — माणसाच्या प्रत्येक हालचालींवर विश्वनिर्मात्याचे नियंत्रण आहेच. आजही कर्माचे फळ येथेच भोगावे लागते. कुणी वर जात नाही. “खूप जगला तो भाग्यवान” — हे म्हणणे चुकीचे आहे, कारण त्याला जीवन नकोसे झालेले असते. आणि जो बोलता बोलता जातो, त्याला विसरणे कठीण असते.
सांगायचे झाल्यास — थोडे बरे,  समीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आज हे जे काही मी लिहित आहे, ते काही कथा नाही किंवा लेख नाही; मला जे योग्य वाटते ते मी लिहितो. या जीवनात आलेले अनुभव मी मांडतो. यामधून काही लोक प्रतिक्रिया देतात आणि त्यातून मला प्रेरणा मिळते.
माझा प्रवास तुम्हाला माहीतच आहे. मागील काळात आम्ही बारा दिवस जेलमध्ये गेलो होतो. आमच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या. वर्धेला आलेल्या एका मुस्लिम एस.पी.ने मनात येईल तशा केसेस दाखल केल्या. तक्रार देणारे कोण? — तर माजी खासदार रामदास तडस यांचा मुलगा आणि दुसरा म्हणजे शहरातील प्रसिद्ध शिक्षणसम्राट शंकर अग्निहोत्री यांचा मुलगा. बाकी छोटे-मोठे होते, पण हे दोघे महत्त्वाचे होते.
यांनी तक्रारी का दिल्या — यामध्येही मोठे रहस्य आहे. माजी खासदारांचा एकुलता एक मुलगा, ज्याने गरीब मुलींचे शोषण केले. एक नाही, दोन नाही — अनेक. मात्र यातली एक मुलगी भारी पडली. तिने अन्यायाचे गाणे अनेकांसमोर गायले. सुरुवातीला पत्रकारांनी मौन बाळगले, कारण पोराचा बाप खासदार. आमचेही चांगले संबंध होते, पण त्या वेळी संबंध जोपासण्यापेक्षा झालेला प्रकार पुढे आणणे गरजेचे होते — आणि तेच आमची परीक्षा होती.
मुलीवर झालेला अत्याचार, तिची तळमळ पाहून आम्ही आमच्या पोर्टलवर बातमी प्रसिद्ध केली. ती रातोरात दिल्लीपर्यंत पोहोचली. मिडिया जागृत झाला. नंतर खूप काही घडले. आमचा रोल संपला. आम्ही घरूनच अक्षदा फेकल्या. आज तिला मुलगाही झाला आहे, पण तिचा संघर्ष संपलेला नाही.
या सर्व प्रकरणाचा ‘नारद’ कोण? — मी. माझ्यावर सहजच कारवाई होणार होती, याची मला पूर्वकल्पना होती.
दुसरा — आपला स्वयंघोषित ‘पंडितजी’ शंकर प्रसाद अग्निहोत्री. हे आज मुताला गाडीने जातात. पैसा इतका कमावला की पैशात जाळले तरी लाकडाची गरज पडणार नाही. यांनी जे केले ते कोणीच करू शकत नाही. यांना ‘देवी’ येते — महाकाली! आता सांगा — माणसाच्या अंगात बाई कशी येईल? अत्यंत विद्वान माणूस आहे, यात शंका नाही. कोणत्याही विषयावर बोलायला लावा — बोलणारच.
पूर्वी हे काँग्रेसचे पक्के होते, पण आता माहित नाही. पोरगा मात्र भारतीय जनता पार्टीच्या नागपूर शाखेत आहे. मागील काळात वर्धेत एका बुजुर्ग माणसाचा जीव याच्यामुळे गेला. मारणाऱ्या कुटुंबाने काही यांचा मुकाबला केला नाही; मामला दाबला.
आम्ही मात्र लिहिले — हा खुनी आहे. याचा याला मोठा राग आला. नंतर आम्ही यांचे बाबा, स्वयं ‘पंडित’, यांचा इतिहास उघड केला. पूर्वी म्हशी पाळणारे, आज अरबपती. यात आम्ही काय चूक लिहिली? पहिले, यांचा म्हशीच्या दुधाचा धंदा होता; आजही नातलग तोच धंदा करतात.
यांना ‘महाकाली’ प्रसन्न झाली — अरबपती झाले. चांगली गोष्ट आहे. पण आम्ही सुरुवातीला लिहिले — “आजच्या पेक्षा काल महत्त्वाचा असतो.” पण हे आता वाघाची शिकार कुत्रा करू शकत नाही, पण संघटित कुत्रे प्रयास करू शकतात.असा प्रसंग तयार झाला. वर्ध्यात नवा एस.पी. आला – नुरुल हसन नावाचा.
याची पत्नी पूर्वीच दत्ताजी मेघे यांच्या कॉलेजात मोफत शिकत होती.
पुढे याने आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेतला.
सर्व पोलिसांची तपासणी सावंगीला — या तपासणीचा निधी तर दवाखान्यात पोचला, पण तपासण्या झाल्या की नाही माहीत नाही.
रेतीमधून कोटी रुपये, बंगल्याच्या विद्युत बिलात घोळ, इतकेच नव्हे तर गरीब कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरच्या नावाने लाखांची उचल, मात्र खात्यात पाच पैसेही जमा नाहीत. नोयडाला कोट्यवधींची जागा, सलग अनेक ठिकाणी जमिनी खरेदी, कुणाकडून महागडी गाडी तर कुणाकडून इतर वस्तू — जे मिळेल ते दाबले.
आम्ही याची बातमी केली. चांगली आग झाली. आणि काही “कुत्र्यांनी” संपर्क करून गणित आखले. नावाने तडस पण कर्माने कुत्रा — सर्वप्रथम खासदार साहेबांचा मुलगा पुढे आला. खंडणीची खोटी तक्रार दिली. हळूहळू अग्निहोत्री आणि इतर कोण कोण पुढे आणले. आणि मित्रांनो, नऊ बोगस गुन्हे आमच्यावर दाखल केले.
आम्हाला या त्या पोलिस ठाण्याच्या कस्टडीत दाबले, कारागृहातही गेलो. सगळा अनुभव घेतला. असली-नसली भीतीच निघून गेली. आयुष्यात कस्टडी आणि जेल हेच बघितले नव्हते — ते पण बघितले.अंदर गेल्यावर
आपल्या पेक्षा मोठी मंडळी भेटतात — कोणी डॉक्टर, कोणी तहसीलदार, कोणी आरटीओ तर कोणी डेप्युटी कलेक्टर, आणि कोणी पोलिसातला साहेब. विशेष म्हणजे गुरुजी लोक, आणि आरोप मात्र सर्वांवर सारखा — विद्यार्थिनीचा विनयभंग.मी जेलमध्ये एक अनुभवले — कोणी खोटे बोलत नाही. “केले ते केले” म्हणतात. सांगा आता, हा अनुभव सुद्धा महत्त्वाचाच होता. अत्यंत शिस्त! कितीही मोठा बदमाश असो, तो प्रामाणिकासारखाच वागतो. कारण तो एक परिवार आल्याप्रमाणे सर्व राहतात.
याचे कारण काही मी समजू शकलो नाही. हजारो पोलिसांना न मोजणारा मोठा आरोपी, कारागृहात एका शिपायासोबत सौजन्याने वागतो. त्यांचा मान-सन्मान ठेवतो. त्यांची प्रतिमा चांगली असते. म्हणून की काय, काहीच समजत नाही.
मित्रांनो, जे मी लिहितो ते अनेक लोक वाचणार आहेत. मी जेलमध्ये गेलो असे कुणी सांगतो का? मी का सांगतो? कारण मला भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याची कीव येते — जो आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेतो.आणि निर्दोष माणसाला आरोपी करतो .त्याला ही उतार द्यावेच लागेल.खरा गुन्हेगार हा गप्प बसतो.निर्दोष नाही.बाबासाहेब म्हणतात ना.बकऱ्याला बळी देता येतो वाघाला नाही.काही वेळा करिता डांबता येते.त्याचे परिणामही वाईट होतात.
कारागृहात माणूस आत्मपरीक्षण करून पुढील वाटचाल चांगली किंवा वाईट ठरवू शकतो. कारागृहात मोठ्यात मोठ्या गुन्हेगाराची दाट मैत्री होते. अल्पावधीत एकमेकांना जीव लावतात, आणि यातून प्लॅनिंग होते. बाहेर आल्यानंतर मोठे गुन्हे घडतात.
मित्रांनो, मी प्रत्यक्षात नुरुल हसन यांचा भ्रष्टाचार लिहिला होता — ते माझे कार्य आहे. मात्र त्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन केलेला प्रकार हा बेकायदेशीर होता. यात माझा परिवार अचानक धास्तीत आला.
मुलगी एल.एल.बी.च्या शेवटच्या वर्षात होती, मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंगला होता. मुलीच्या नागपूर फ्लॅटवर पोलिस धाड — लॅपटॉप आणायला गेले. घरचे कॉम्प्युटर नेले, मोबाईल नेले. रात्री-बेरात्री पोलिस घरी. वास्तविक मी कारागृहात आणि पोलिस माझ्या घरी.
हे सगळे सहन केले. आणि जर यावर विपरीत विचार करून चुकीचा निर्णय घेतला असता, तर राज्यात पोलिस खात्याचीच मोठी नाचक्की झाली असती. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, पण ज्याला नाहक गुन्हेगार केले जाते — तोच खरा खतरनाक ठरतो.
असे प्रसंग नेहमी घडत नसतात. जो अधिकारी आपल्या कार्याची, कर्तव्याची शपथ विसरून स्वार्थासाठी पदाचा गैरफायदा घेतो, तेव्हा असे प्रसंग घडतात.
म्हणून पोलिस अधिकारी बांधवांनी, वैयक्तिक आकस काढण्यासाठी कुणाला गुन्हेगार बनवले, तर पुढील काळात यंत्रणेवरील विश्वास उडेल. यातून तयार होईल खतरनाक गुन्हेगार. आणि याला जबाबदार असतील निवडक भ्रष्ट पोलिस अधिकारीच.
आजही प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांची कमी नाही. त्यांच्या कार्यकाळात जनतेसोबत निर्माण झालेले नाते आयुष्यभर टिकते. बदली होताना जनतेचे अश्रू निघतात — अशी अनेक उदाहरणे आहेत.
काही पोलिस अधिकाऱ्यांनी नुरुल हसन यांच्या सांगण्यावरून काय काय नाही केले. मलाच त्यांची कीव येते — हे मरताना किडे पडून मरणार की सडून मरणार!
मी आवर्जून सांगतो — मी प्रथम जेलमध्ये गेलो. जेलर साहेबांना माहीत होते की हा पत्रकार येणारच आहे. मी गेलो, आणि पाठीमागून पूर्वी गुन्हे शाखेत आलेला पोलिस निरीक्षक, बैल माणूस, तिकडे आला — “माझ्याकडे फॉर्च्यूनर कार आहे” हे सांगायला! म्हणजे मी मोठा करोडपती आहे, हे जेलमध्ये सांगणे का महत्त्वाचे वाटले असेल? विचार करा.
नंतर जेलर साहेबांनी सांगितले की — “हा काय सांगायला आला होता” — आणि खंत व्यक्त केली की पोलिसांच्या मनात जेलबद्दल मोठा गैरसमज आहे.
मित्रांनो, असा काळ आलाच पाहिजे — यामधून कळते की खरा आपला कोण आहे. रोज सोबत बसणारा दोस्त कामाचा नसतो — फक्त परिवारच आपला असतो. पाठीवर पाय देऊन आलेला भाऊही दूर पळतो. म्हणून परिवार महत्त्वाचा असतो.असे प्रसंग येतात-जातात, पण यामुळे धैर्य तुटू नये. यातून नवीन जोमाने सुरुवात होते. यातून तोटे कमी आणि फायदेच होतात. सर्वात महत्त्वाचे — स्वार्थी लोक परत जवळ येत नाहीत, आणि आले तर हाकलून लावण्याची ताकद निर्माण होते.
मुलांना जिद्द निर्माण होते, विकास होतो. माझ्या मुलीने गोल्ड मेडल मिळवले, एल.एल.बी. पूर्ण केली आणि नंतर एल.एल.एम. केले. मुलाने डिप्लोमा फर्स्ट क्लासमध्ये पास केला.पत्रकारिता जर कुणाची चापलूशी न करता केली, तर असे प्रसंग येणारच. मात्र याला उत्तर देणे गरजेचे आहे. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा प्रसंगाचे उतार कायद्याच्या बाजूने द्यायचे, हे कायद्यात नमूद केले आहे.
कायद्याने खोटी तक्रार देणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी तर बारा दिवस तुकडे मोडले, पण खोटी तक्रार देणारे बारा महिने कुटके मोडतील असा बंदोबस्त करून ठेवला आहे.
क्रमशः
मित्रांनो, वाचा आणि विचार करा. मी जेलमध्ये गेलो होतो, ही तुमच्या आठवणीत राहावी म्हणून लिहित आहे. पुढे अनेक प्रसंग मी लिहिणार आहे — टाइमपास म्हणून वाचा…मी नालायक आहे असे आपल्याला वाट्याला नको..


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles