
सांगा, काय म्हणावे?
सांगा, काय म्हणावे?
बघा आणि विचार करा—याला काय म्हणावे?
वर्धा (विशेष प्रतिनिधी): वर्धा शहर हे स्वातंत्र्य प्राप्तीचे धर्मस्थान आहे. स्वातंत्र्य मिळालं, मात्र शिस्त हरवली. जेव्हा पोलिस अधीक्षक लायक असतात, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या नालायकपणाचे नमुने पुढे येतात. पण अधीक्षकच नालायक आला, की मग त्यांची तर फजितीच होते.
आज आम्ही वर्धा शहरातील बजाज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांचे शूटिंग केले. सर्वांनी बघा आणि केवळ विचार करा—याला काय म्हणावे? अगदी रस्त्यामध्ये त्यांचे वाहन उभे आहे, आणि त्यावर बसून गप्पा मारण्यात व्यस्त आहेत आमचे वाहतूक कर्मचारी.
वास्तविक, हे पुरुष नव्हते, महिला होत्या. या महिला वाहतूक कर्मचाऱ्यांनी वेशीला टांगली की काय?, असा प्रश्न पडतो. हीच त्यांची ड्युटी? अर्ध्या रस्त्यात वाहने उभी करून गप्पांचा फड सुरू आहे. आजचा वेळ—रात्री आठ वाजता. फोटोत दोन वाहने दिसत असली, तरी प्रत्यक्षात तिथे तीन वाहने होती.
यातील एक कर्मचारी महिलेला हे लक्षात आले आणि त्या महोदया तिकडून निघून गेल्या. शिस्तीची ऐशी तैशी केली राव! वरिष्ठांच्या नावाला कलंक लावण्याचे काम वर्धा वाहतूक पोलिस कर्मचारी करत आहेत.
केवळ वसुली करण्यासाठी वाहतूक शाखेत आलेले हे लोक, केवळ गरीबांच्या दुखण्यावर बोट ठेवून संघटित पद्धतीने पैसे उकळतात. मात्र कर्तव्याच्या नावाखाली फक्त बारागाडे बोंब!
यांच्यावर कारवाई होईल का नाही माहीत नाही. पण आपण आपले काम करत राहू,….