वर्धा पोलिस ठाण्यातील वादग्रस्त प्रकार — पोलिस अधिकाऱ्याविरोधात आत्मदहनाचा इशारा

वर्धा पोलिस ठाण्यातील वादग्रस्त प्रकार — पोलिस अधिकाऱ्याविरोधात आत्मदहनाचा इशारा
बेकायदेशीररीत्या सीसीटीव्ही काढला; न्यायालयाचा अवमानाचा आरोप — दोन जणांचा आत्मदहनाचा इशारा

जबरदस्तीने समान बाहेर काढण्याचा प्रयत्न.केला जात असल्याचा हाच तो व्हिडिओ.

स्पष्ट शब्दात ऐकू येते. उदया पर्यंत दुकान खाली करा.असे दुकाने खाली करण्याचे पोलिसांना अधिकार कोणी दिले?

नोटीस लावुन मोबाईल वर फोटो कोणत्या नियमात बसते

वर्धा (प्रतिनिधी) :

           न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही वर्धा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी ‘सवयी’ यांनी आदेश धुडकावल्याचा गंभीर आरोप नागरिक अजय ताकसांडे यांनी केला आहे. दुकान खाली करण्याच्या धमक्या, जबरदस्तीने दुकानातील लोकांना दमदाटी, महिलेला पोलिस ठाण्यात बोलावून अयोग्य वर्तन, तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बेकायदेशीररीत्या काढून न परत करण्याचे प्रकार यामुळे ताकसांडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.ताकसांडे यांचे म्हणणे आहे की, प्रकरण हे सिव्हिल स्वरूपाचे असूनही पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. सुरुवातीला ठाणेदार श्री. पोट साहेब यांच्या सांगण्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक (सा. पो. नी) बानोद यांनी त्यांच्यावर मारहाण केली. त्यानंतर दुकान खाली करण्याच्या वारंवार धमक्या दिल्या. त्यांच्या पत्नीला ठाण्यात बोलावून मानहानी करणारे वक्तव्य करण्यात आले.न्यायालयाने दुकानातील कॅमेरे तात्काळ परत करण्याचा आदेश दिला होता; मात्र ते परत न करता उलट मोबाईलवर धमकीचे संदेश पाठवण्यात आले. याशिवाय, स्वतःच्या सहीचे सूचनापत्र दुकानात लावून त्याचे फोटो ताकसांडे यांना पाठवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.ताकसांडे यांनी स्पष्ट केले की, “या पोलिस अधिकाऱ्याच्या जाचातून मुक्त होण्यासाठी मी आत्मदहन करणार आहे. माझ्या मृत्यूला ‘सवयी’ हेच जबाबदार असतील.” त्यांनी आपले आत्मदहनाचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही नमूद केले.दरम्यान, बांधकाम विभागाशी संबंधित आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बांधकाम देयके मिळाली नसून मोठी रक्कम अडकली असल्यामुळे कंत्राटदार बाबा झाकीर यांनीही आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या विरोधात हे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles