
कानगाव येथील वर्मा ज्वेलर्समध्ये मध्यरात्री चोरी
कानगाव येथील वर्मा ज्वेलर्समध्ये मध्यरात्री चोरी
गाडेगाव :(राजीव गिरी)
जवळच्या कानगाव येथील नांदगाव रोडवर असलेल्या सुहास वर्मा यांच्या वर्मा ज्वेलर्स या दुकानात गुरुवारी (दि. २२ ऑगस्ट) मध्यरात्री चोरीची घटना घडली.
चोरट्यांनी दुकानाचे ग्रील व दरवाजे तोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर कापड बांधलेले तीन आरोपी अस्पष्ट दिसून आले आहेत. प्राथमिक तपासात दोन लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, आरोपींना लॉकर फोडण्यात यश आले नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दागिने सुरक्षित राहिल्याचे दुकानदाराने सांगितले.
या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.