
,प्रकरण दाबण्याकरिता पैसे देण्याचा प्रयत्न,प्रकरण मानवाधिकार आयोगात
मारहाण,प्रकरण दाबण्याकरिता पैसे देण्याचा प्रयत्न,प्रकरण मानवाधिकार आयोगात.
वर्धा(प्रतिनिधी)
हेच ते रामनगर पोलिस ठाण्यातील चार दारूबंधी करणारे चार कर्मचारी.कुणालाही करतात मारहाण, पैसे कमविण्या करिता आपल्या अधिकाऱ्याच्या आडून करतात उचलेगिरी.
रामनगर पोलिस ठाण्याच्या दारूबंदी पथकाच्या चार कर्मचाऱ्यांनी निष्पाप तरुणाला पकडून अमानुष मारहाण केली होती राज अमृतकर हा तरुण परिसरात उभा असताना दारूबंदी पथकाने त्याला अडवले व “दारू विकतोस का?” अशी चौकशी केली. मात्र त्याच्याकडे कोणताही दारूचा साठा न सापडूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने उचलून नेले.ठाण्यात न नेता त्याला एका खासगी खोलीत डांबण्यात आले. तेथे पथकातील कर्मचारी बंडू महाकालकर, मुकेश वंदिले, मनोज बोभले आणि विक्की अनेराव यांनी मिळून त्याला जबरदस्त मारहाण केली. यावेळी “पैसे दे, नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करू” अशा धमक्या देत त्याच्याकडून लाच मागण्यात आली. पैसे न दिल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर निर्दयीपणे मारहाण केली.मारहाणी दरम्यान अमृतकरच्या आधीच दुखापत झालेल्या पायाला गंभीर इजा झाली. वेदना असह्य झाल्याने अखेर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर तो थेट सरकारी दवाखान्यात दाखल झाला.त्या ठिकाणी जाऊन या कर्मचाऱ्यांनी त्याला पैसे घेऊन मामला दाबण्याचा विनंती केली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.घटनेनंतर पीडित अमृतकरने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे मंगेश चोरे यांच्याशी संपर्क साधला. यामध्ये मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पीडितासोबत असलेल्या एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांनी प्रकरण दाबून टाकण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो आयोगाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावा उपलब्ध झाला आहे.येणाऱ्या काही काळातच यांची वाट लागणार हे मात्र तेवढेच सत्य आहे.सदर विषयात येथील ठाणेदार यांना काहीही माहिती नाही हे सुद्धा तेवढेच खरे.पैसे कमवून कमविण्या करिता काही भ्रष्ट कर्मचारी हे कोणतीही बेकायदेशीर कामे करण्यास मागे पुढे पाहत नाही.त्यामुळे पूर्ण पोलिस यंत्रणा ही बदनाम होते.जरी कोणी दारू विकत असेल त्याच्यावर गुन्हे असेल तरी त्याला मारहाण करणे हे मानवाधीकारचे उलंगण आहे.