जनावरांच्या दवाखान्यात कर्मचाऱ्यांची बेफिकिरी; नागरिक संतप्त

जनावरांच्या दवाखान्यात कर्मचाऱ्यांची बेफिकिरी; नागरिक संतप्त

कायम लंच सुरू राहणारा हाच वर्धेचा तो जनावरांचा दवाखाना कायम फाटक बंद.ते फाटक बंद करणारे खासगी पिलान टू कोण.?

वर्धा (प्रतिनिधी) : वर्धा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची वागणूक जनावरांपेक्षाही बेफिकिरीची असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष सेवेचा नागरिकांना काहीही फायदा होत नसल्याचे चित्र उघड झाले आहे.

नुकतेच काही नागरिकांनी उपचारासाठी आपला पाळीव कुत्रा या दवाखान्यात आणला असता, त्यांना गंभीर गैरसोयींना सामोरे जावे लागले. सकाळी अकरा वाजेपासून दवाखान्यातील कर्मचारी आपापल्या जागी उपस्थित नव्हते. पावती देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर हजर असूनही कामकाज न करता ‘लंच टाईम’चे कारण पुढे करून नागरिकांना नकार दिला. दरम्यान, लंच टाईम संपल्याचे नावच नसल्याने नागरिक ताटकळत उभे राहिले.

दवाखान्याच्या आतील खोली ‘लंच रूम’मध्ये रूपांतरित करण्यात आल्याचे दिसून आले. काही अधिकारी व कर्मचारी तासन्‌तास गप्पा मारण्यात गुंग होते. या दरम्यान नागरिकांची व प्राण्यांची सतत उपेक्षा होत असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. “सरकारी दवाखान्यात सेवा मिळत नाही म्हणून खासगी दवाखान्यांकडे जावे लागते. मग या अधिकाऱ्यांना पगार का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या दवाखान्यातील बेफिकीर कर्मचाऱ्यांवर तातडीने सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी. जनावरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना शासनाने योग्य ‘औषध’ द्यावे, अशी मागणी होत आहे.पुढील भागात वाचा येथील औषधाचा आणि बनावट बिलांच्या भागीदारीत कोण ?


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles