
वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे उपद्व्याप करणारा तो पोलिस अधिकारी कोण?
वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे उपद्व्याप करणारा तो पोलिस अधिकारी कोण?
वर्धा (मंगेश चोरे)
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हाती आलेली माहिती अत्यंत धक्कादायक असून वर्धा पोलिस विभागात हल्लीच आलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्याच पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बदनामी व्हावी या दृष्टीने शहरात एक चांडाळ चौकडी तयार केली असल्याचे समजते.काही दिवसापूर्वी चांगलेच फॉर्मात असलेले हे अधिकारी असून मागील काळात त्यांनी अनेक प्रकरणांत आपल्या लाचखोर तत्कालीन वरिष्ठांच्या सेवेत बोगस बियाणे प्रकरणात रोकड साठ लाख रुपयांची उचलेगिरी केल्याचे समोर आले. त्यानंतर एका पोलिस ठाण्यात जिकडे तिकडे अवैध धंदे उघडण्याची परवानगी देऊन किमान दीड कोटींची माया गोळा केली. मात्र कप्तान बदली झाल्यानंतर हे सर्व उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे तारे गेले, अधिकार गमावले आणि उचलेगिरी अंगावर आली. परिणामी त्यांची दुर्गती झाली.म्हणतात ना, “जसे कर्म तसे फळ देतो ईश्वर”. यांच्यावर ईश्वर कोपला आणि त्यांनी शहरातील काही दानव हाताशी धरलेत आणि सुरू केला उचापतीचा कारनामा. अंगावर असलेल्या खाकी कपड्यांची इभ्रत गमावण्याचे प्रकार सुरू केले. सूत्रांच्या माहितीनुसार वातावरण गढूळ करण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.हल्ली हे चांडाळ चौकडीच्या करामती करण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी आपले तोंड खुपसत असले तरी त्यांच्या हाती यश आलेले नाही. मात्र सतत या चांडाळ चौकडीला घेऊन ते लिखापढी करत आहेत. याचा शोध आमच्या वतीने घेणे सुरू आहे…