
आज झालेल्या लोकअदालत मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या २९४५ केसेस निर्गती, तर १८,७८,७५० रुपये शासकीय दंड वसूल
आज झालेल्या लोकअदालत मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या २९४५ केसेस निर्गती, तर १८,७८,७५० रुपये शासकीय दंड वसूल
वर्धा(प्रतिनिधी)आज दिनांक १३/०९/२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन मा. न्यायालयात करण्यात आले होते. त्यामध्ये ज्या वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते, त्यांच्या शासकीय दंडाच्या केसेस तडजोडीसाठी आज लोकअदालत मध्ये ठेवण्यात आल्या होत्या.त्यासंदर्भात वाहनचालकांना समन्स बजावणी ही वाहतूक शाखेकडून करण्यात आली होती. या आवाहनास वाहनचालकांनी चांगला प्रतिसाद दिला व एकूण २९४५ चलन केसेस निर्गती निघाल्या. यातून १८,७८,७५० रुपयांचा शासकीय दंड आज लोकअदालत व वाहतूक शाखेत वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला.वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले, शिस्त पाळली तर त्यांना चलन केसेस होणार नाहीत, तसेच आर्थिक दंड आकारला जाणार नाही, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांनी केले आहे.