
तीन दिवसांत खुनाचा छडा – द्रोणच्या मदतीने आरोपी गजाआड
तीन दिवसांत खुनाचा छडा – द्रोणच्या मदतीने आरोपी गजाआड
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शन – पोलिस निरीक्षक चौधरी यांच्या पथकाचे कौतुक
वर्धा (मंगेश चोरे पाटील) :
सालोड गावातील खळबळजनक खुनाच्या घटनेचा उलगडा केवळ तीन दिवसांत करत वर्धा पोलिसांनी आपली दक्षता व कार्यक्षम तपासकौशल्य सिद्ध केले आहे. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने द्रोण तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले.
सालोड तलाव परिसरात मृत अवस्थेत युवकाचे प्रेत आढळल्याने प्रथमदर्शनी हा प्रकार आत्महत्येचा वाटत होता. परंतु मृतकाचा गळा आवळण्यात आल्याचे निष्पन्न होताच हा खून असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी तपासाची धुरा गुन्हे शाखेकडे सोपवली.पोलिस निरीक्षक श्री. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपींनी वारंवार आपले लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आधुनिक द्रोण तंत्रज्ञानाचा वापर करून पाडेगाव जंगल परिसरात आरोपींचा शोध लावला. या कारवाईत दिलीप महेश्वरी व विजय मसराम या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.फक्त तीन दिवसांत खुनाचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करणाऱ्या या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपींना पुढील तपासासाठी सावंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या खुनामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.मागील पांढरा वर्षा नंतर सालोड गावातला हा दुसरा खून आहे.यात पोलिसांनी दाखवलेली कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचा केलेला वापर हा जिल्ह्यातील पोलिस दलासाठी नक्कीच उल्लेखनीय ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.आणि हा मार्गदर्शनाचा मोठा भाग आहे.हे मात्र खरे.