मेडिट्रिना रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात संचालक डॉ. समीर पालतेवार, सोनाली पालतेवार यांच्यासह १८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

मेडिट्रिना रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
संचालक डॉ. समीर पालतेवार, सोनाली पालतेवार यांच्यासह १८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

हाच तो नागपुरातला डॉक्टर पालतेवार , आता हा पालथा झाला आहे.मागील काळात आम्ही याची चांगली पुंगी वाजविली होती.मात्र हा थोडक्यात सटकला.आणि वर्धेच्या माजी खासदाराला पकडून याने आमची माखण्याचा प्रयत्न केला.माजी खासदारही पालटला आणि आता हा लटकला..वाचा सविस्तर कहाणी……आता हा कुत्र्या सारखा पळ पळ पळतो आहे…

नागपूर :(मंगेश चोरे) रामदासपेठ येथील मेडिट्रिना रुग्णालय स्थापनेपासूनच वादग्रस्त ठरले आहे. अनेक वेळा चर्चेत आलेले संचालक पुन्हा एकदा गंभीर प्रकरणात अडकले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी संचालक डॉ. समीर पालतेवार, त्यांची पत्नी सोनाली पालतेवार यांच्यासह १८ जणांविरोधात सिताबर्डी पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल केला.भागीदाराकडूनच तक्रार
हा गैरप्रकार डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली केल्याची तक्रार रुग्णालयातीलच भागीदार गणेश रामचंद्र चक्करवार (६५, कॅनल रोड, रामदासपेठ) यांनी केली आहे. चक्करवार हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून, रुग्णालयाचे फाऊंडर मेंबर आहेत.आधीचेही गुन्हे
विशेष म्हणजे, मेडिट्रिनाविरोधात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई नाही. २०१९ व २०२१ मध्येही अशाच प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले होते. त्यामुळे ‘पांढरपेशी संघटित गुन्हेगारी’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.कंपनी स्थापनेपासून कारभार
२००६ मध्ये चक्करवार यांनी डॉ. पालतेवार व इतरांसोबत व्हीआरजी हेल्थकेअर प्रा. लि. कंपनी सुरू केली. त्यातून २०१२ मध्ये मेडिट्रिना रुग्णालयाची स्थापना झाली. २०१६ मध्ये इतर लोक बाहेर पडल्यावर चक्करवार व पालतेवार हेच ५०-५० टक्क्यांचे भागीदार राहिले. इस्पितळाच्या नवीन बांधकामासाठी ६७ टक्के शेअर आवश्यक असल्याचे सांगत, चक्करवार यांनी १७ टक्के शेअर्स तात्पुरते सोनाली पालतेवार यांच्या नावावर केले. मात्र त्यानंतर, चक्करवार यांच्या आरोपानुसार, पालतेवार दाम्पत्याने मनमानी कारभार सुरु केला.करोडो रुपयांची अफरातफर
पालतेवार दाम्पत्याने मुलगा निनादसोबत ऑब्व्हिएट हेल्थकेअर प्रा. लि. कंपनी स्थापन केली.२०२०-२१ मध्ये २ कोटी रुपये२०२१-२२ मध्ये २.९१ कोटी रुपये२०२२-२३ मध्ये ३.३६ कोटी रुपये२०२३-२४ मध्ये ३.१३ कोटी रुपयेअसे एकूण ११.४१ कोटी रुपये मेडिट्रिनाच्या खात्यातून काढल्याचा आरोप आहे. याची कुठलीही कल्पना भागीदार चक्करवार यांना दिली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बनावट बिले आणि संशयास्पद कंपन्या
वार्षिक अहवाल तपासताना डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली बनावट बिले तयार करून पैसे काढल्याचे चक्करवार यांच्या लक्षात आले. या रकमा ॲबस्ट्रॅक्ट आयटी ग्रुप, एके हेल्थकेअर सर्व्हिसेस, एमबी हेल्थ केअर सर्व्हिसेस, पी.एस. हेल्थ केअर सर्व्हिसेस, अलाईड हेल्थकेअर सर्व्हिसेस आदी विविध कंपन्यांच्या खात्यात बेकायदेशीर मार्गे जमा झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.पोलिस कारवाई
चक्करवार यांच्या तक्रारीवरून डॉ. समीर पालतेवार, सोनाली पालतेवार, निनाद पालतेवार यांच्यासह अर्पण पांडे, किशोर पांडे, अभिषेक पांडे, आकाश केदार, मुकेश व वैशाली बडवाईक, तृप्ती घोडे, रिता व कल्याणी बडवाईक, नईम दिवाण, सर्वेश व प्रियंका ढोमणे आदी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यांची पळापळ सुरू झाली आहे.मागील काळात यांना सुप्रीम कोर्टाने जमानत मिळाली मात्र आता यांचे काही खरे नाही.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles