
सावंगी पोलिसांवर गुन्हेगारांचा प्राणघातक हल्ला
सावंगी पोलिसांवर गुन्हेगारांचा प्राणघातक हल्ला
दोन पोलीस अधिकारी व एक कर्मचारी गंभीर जखमी, अठरा आरोपी ताब्यात – मुख्य आरोपी फरार
वर्धा (/मंगेश चोरे पाटील):
आज दुपारी साधारणपणे चार ते पाच वाजेच्या दरम्यान सावंगी शिख बेड्यावरील कुविक्यात गुन्हेगार राजकुमार बावरी याने आपल्या घरच्यांसह आणि साथीदारांसह पोलिसांवर तलवारी, फरशा, धारदार शस्त्रे व दगडांनी प्राणघातक हल्ला केला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राखीव पोलिस दल, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर सावंगीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी धाडस दाखवत आपल्या सहकाऱ्यांसह अठरा आरोपींना ताब्यात घेतले, मात्र मुख्य आरोपी राजकुमार बावरी फरार होण्यात यशस्वी झाला.सावंगी पोलिसांना शिख बेड्यावर मोठा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन पीएसआय व डी.बी. प्रमुख संजय पंचभाई हे पथकासह घटनास्थळी कारवाईसाठी गेले. मात्र पोलिस दिसताच राजकुमार बावरी अंगावर धावून आला आणि अचानक हल्ला चढविला.यानंतर घरातील महिला व इतर २०-२२ साथीदारांनीही शस्त्र हातात घेऊन पोलिसांवर तुटून पडत दोन पीएसआय व डी.बी. प्रमुख यांना गंभीर जखमी केले.ठाणेदार पंकज वाघोडे यांनी तातडीने प्रतिसाद देत अठरा आरोपींना पकडले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी फौजफाटा दाखल करून तलवारी, फरशा, लोखंडी शस्त्रे जप्त केली.जखमी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु आहेत.राजकुमार बावरी फरार असून त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत दाखवणारे आरोपी आता भीतीपोटी पळ काढत असल्याचे दिसून येत आहे तर हल्ली स्थिती नियंत्रणात आहे.