
पोलिसांवरच्या हमल्यामागे माजी ठाणेदारच ?
पोलिसांवरच्या हमल्यामागे माजी ठाणेदाराच ?
तत्कालीन ठाणेदार शकुनीचा भूमिकेत करतो काड्या. हमला झाला वार जिवावर गेला.
———————————————–
वर्धा (मंगेश चोरे पाटील)
काल सावंगी पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हमल्याने जिल्हा हादरला आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले. आतापर्यंत सावंगी परिसरात पोलिसांवर थेट हल्ला करण्याचे धाडस कोणत्याही गुन्हेगाराने केले नव्हते. मात्र यावेळी गुन्हेगार तलवारी घेऊन पोलिसांवर तुटून पडले. प्रश्न असा निर्माण होतो की या गुन्हेगारांना एवढी हिंमत कुठून आली? यामागे त्यांचा ‘गुरू’ कोण? सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे सावंगी पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार कापडे साहेब यांचा अप्रत्यक्ष हात असल्याचे उघड झाले आहे. कापडे यांच्या काळात ठाण्यातून मोठी कमाई होत असे. जुगाराच्या हप्त्यांमधून त्यांना चांगला हिस्सा मिळत असल्याची चर्चा होती. स्थानिक गुन्हेगारांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचेही समोर आले आहे.
सावंगी ठाण्यावर नुकतेच आलेल्या ठाणेदारांनी गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरू केली. जुगारासह इतर अवैध धंद्यांवर त्यांनी घाला घातला. त्यामुळे गुन्हेगारांचा श्वास रोखला गेला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कापडे यांना आपला गुरू मानत, त्यांच्या सल्ल्यानुसार हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
कापडे यांनीच गुन्हेगारांना “एकदा पोलिसांवर धाडसाने हल्ला केला, तर पुन्हा कोणी फिरकत नाही” असा सल्ला दिल्याचे समजते. यामुळेच गुन्हेगार हिंमत करून तलवारीसह पोलिसांवर तुटून पडल्याची माहिती पुढे येते.
कापडे यांनी पोलिस खात्यात असतानाच काही कार्यकर्त्यांची एक टीम तयार केली होती. ही टीम दिवसभर कुचकट चर्चा, खोटी लिखापढी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोप आहे. शास्त्री चौकातील एका झेरॉक्स दुकानातून ही मंडळी सतत अशा कारवाया करीत असल्याचेही समजते
या प्रकरणामुळे पोलिस विभागातच असलेल्या सैतानी प्रवृत्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधितांची सखोल चौकशी झाली तर “दूध का दूध, पाणी का पाणी” होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.