
दुःखद वार्ता : सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा किशोर वानखडे यांचे निधन
दुःखद वार्ता : सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा किशोर वानखडे यांचे निधन
वर्धा : सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सुनंदा किशोर वानखडे (वय ६५ वर्षे) यांचे रात्री १२.४० वाजता पाटीलनगर, गोपुरी चौक, वर्धा येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.गेल्या सात महिन्यांपासून त्या सावंगी रुग्णालयात कर्करोगासाठी उपचार घेत होत्या. सामाजिक जाणिवा आणि सेवाभाव जपणाऱ्या वानखडे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव शरीर आज सकाळी १० वाजता सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहे.त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. 🙏