गर्दीच्या ठिकाणी दारू पिऊन वाहनचालकाला अटक – वाहन जप्त

गर्दीच्या ठिकाणी दारू पिऊन वाहनचालकाला अटक – वाहन जप्त

वर्धा (प्रतिनिधी) :
गर्दीच्या ठिकाणी दारू पिऊन बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेत वाहनही जप्त करण्यात आले आहे.दि. 29 सप्टेंबर रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या आदेशानुसार आर्वी नाका चौक येथे वाहतूक अंमलदार पो. हवा. आशिष देशमुख हे गस्तीदरम्यान ड्युटीवर असताना, स्विफ्ट (क्र. MH-32-C-6241) ही चारचाकी गाडी अतिवेगाने व निष्काळजीपणे चालविताना आढळली.गाडी चालकाने गर्दीतून जाताना पादचारींना धडक दिल्यानंतर पोलिसांनी वाहन थांबविण्याचे सांगितले. मात्र, चालकाने वाहन थांबविण्याऐवजी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्याने मद्यसेवन केलेले असल्याचे निष्पन्न झाले.सदर गाडी चालक समीर अरुण काकडे (वय 22, रा. बाबापूर, हमदापुर, ता. समुद्रपूर) याच्याविरुद्ध कलम 281 BNS तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पो. हवा. आशिष देशमुख व एएसआय मंगेश येळणे यांनी सकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत आरवी चौकात केली.वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, दारू पिऊन वाहन चालवणे हे कायद्याने दंडनीय असून त्यातून जीवितहानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारापासून दूर राहावे.

पो. नि. वाहतूक शाखा, वर्धा


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles