छत्रपती सेनेची स्थापना वर्धेत : गोरगरिबांच्या हक्कासाठी नवे व्यासपीठ

छत्रपती सेनेची स्थापना वर्धेत : गोरगरिबांच्या हक्कासाठी नवे व्यासपीठ


वर्धा (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून अन्यायाविरुद्ध लढा देत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी वर्धा येथे “छत्रपती सेना” या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.
या संघटनेचे राज्यव्यापी कार्य होणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक रमेश चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी, दिलीप भाऊ भुजाडे यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी, तर राजेंद्रजी झांबरे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी म्हणून प्रकाश डोडानी (उपाध्यक्ष), मोहन भाऊ साठवणे (जिल्हा सचिव), कृष्णराव मुते (जिल्हा महासचिव), असलम पठाण (जिल्हा संघटक), संजय तिडले (संपर्कप्रमुख), तर सूर्यप्रकाश पांडे (प्रचारप्रमुख) यांची नियुक्ती करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, संघटना ही कोणत्याही राजकीय उद्देशाने नसून अत्यंत विचारपूर्वक अन्याय- अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व शोषित-पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या व्यासपीठात कोणीही सहभागी होऊ शकतो, असे आवाहन त्यांनी केले.
“शिवपथावर चालूया – अन्यायाविरुद्ध लढूया” या घोषवाक्याने संघटनेच्या स्थापनेला प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप भुजाडे यांनी केले, संचालन जयवंतराव भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन सूर्यप्रकाश पांडे यांनी केले.
याप्रसंगी राजाभाऊ साबळे, चंद्रकांत तिळले, नरेंद्र निस्ताने, अरविंद पर्वत, मयूर धाबडे, शेख रहीम, आशिष इंगळे, सुधीर भाऊ सूर्यवंशी, आनंद गिरधर, गजानन दांडेकर, संजय वाके, प्रशांत पांडे, चंद्रशेखर इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles