
वर्धा नायब तहसीलदार धर्माधिकारी यांच्या प्रकरणात छत्रपती सेनेचा पहिला निर्धार
हेच आहे वर्धेचे नायब तहसीलदार साहेब,श्री धर्माधिकारी साहेब,यांचे अनेक कुकर्माचे पुरावे असताना होत नाही कारवाई
वर्धा (प्रतिनिधी) वर्धा येथील नायब तहसीलदार धर्माधिकारी यांच्या कुकर्माविरोधात आम्ही सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या असून, पीडित महिलेने स्वतःची आपबिती सार्वजनिकपणे व्यक्त केली आहे. मात्र आजही तिच्यावर दबाव आणण्यासाठी साहेबांच्या वतीने धमकीचे फोन व मेसेज येत आहेत. याबाबत तक्रार करण्यासाठी महिला पोलिस ठाण्यात गेली असता, पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ केली.भक्कम पुरावे उपलब्ध असतानाही “प्रथम चौकशी करू” या कारणावर पोलिस प्रशासन गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहे. वर्धा पोलिस ठाण्याचा कारभार बेताल झाला असून, येथील नेतृत्व सैल पडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर पीडित महिला स्वतः पोलिस अधीक्षकांना भेटली. त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले, तरीही त्यांच्या आदेशांची दिशाभूल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला.आज उलट गुन्हेगारांचे संरक्षण करणारे काही पोलिस आणि साहेब स्वतःच पीडितेचे लक्षण बरोबर नाही, असे सांगून बदनामी करत आहेत. एखादी महिला स्वतःहून गावभर “माझ्यावर अत्याचार झाला” असे सांगत फिरते का? हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.या प्रकरणामुळे महिलेची गावभर बदनामी झाली असून, न्याय मिळवून देण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. तथापि, न्यायासाठी पोलिस हाच एकमेव मार्ग नाही. गुन्हा न दाखल करणारे पोलिस सुद्धा या प्रकरणात आरोपी ठरणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण खटल्याचा खर्च व पाठपुरावा छत्रपती सेना करणार असल्याचे संघटनेच्या बैठकीत एकमताने ठरले.गोरगरिबांच्या न्यायहक्कासाठी स्थापन झालेल्या छत्रपती सेनेचा हा पहिला निर्धार असून, धर्माधिकारी साहेबांवर कारवाई होईपर्यंत सेना सतत पाठपुरावा करणार आहे. लवकरच या अन्यायाविरोधात एक प्रामाणिक आंदोलन उभारले जाईल. या आंदोलनासाठी पीडित महिला स्वतः पवित्र्यात उभी राहिली आहे.