
राजपालच्या पेट्रोलने वाहनात बिघाड! ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या; ग्राहक मंचात जाण्याची तयारी
राजपालच्या पेट्रोलने वाहनात बिघाड!
ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या; ग्राहक मंचात जाण्याची तयारी.
~~~~~~~~~~~~~~~~
सावधान..सावधान..सावधान..
हाच आहे गोर गरिबाना भेसळ पेट्रोल डिझेल विकणारा वर्धेचा डिझेल माफिया गिरीश उर्फ बुकऱ्या राजपाल
वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा–सेवाग्राम मार्गावरील गिरीश राजपाल उर्फ ‘बुकऱ्या’ यांच्या पेट्रोल पंपावरून भरलेले पेट्रोल वाहनांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक वाहनधारकांनी “पंपावरून पेट्रोल भरताच वाहनाचे इंजिन बंद पडले किंवा खराब झाले” असा अनुभव व्यक्त केला आहे. आतापर्यंत तब्बल १२ वाहनधारकांनी आपली वाहने बिघडल्याची तक्रार केली असून, “खराब पेट्रोलमुळेच नुकसान झाले” असे मत दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकांनीही नोंदवले आहे.स्थानिक कामगारांच्या मते, या पंपावर टँकरमधून काढलेले (मिश्रित) पेट्रोल आणि डिझेल विकले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवून त्यात फेरफार केल्याची शंका व्यक्त केली जाते. तसेच पंपाच्या मशीनमध्ये स्वतःच ‘सेटिंग’ करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोपही समोर आला आहे.मागील काळात या व्यक्तीने पोलिसांच्या पेट्रोल पंपास अडथळा निर्माण केल्याच्या घटनाही चर्चेत होत्या. याच कारणामुळे पोलिसांचा पंप बंद पडल्याचे सांगितले जाते. मात्र पुढील काळात तोच पंप जवळच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते.वाहनधारकांनी आता सावध राहण्याची गरज आहे. “राजपालच्या पंपावरून पेट्रोल भरण्यापूर्वी दोनदा विचार करा,” असा इशारा नागरिक देत आहेत. ग्राहक मंचात एकत्रित तक्रार दाखल करण्याची चळवळ सुरू झाल्याचीही माहिती मिळाली आहे.