वर्धा नगराध्यक्षपद : भाजपच्या उमेदवारांवर चर्चेची लगबग

वर्धा नगराध्यक्षपद : भाजपच्या उमेदवारांवर चर्चेची लगबग

ओबीसी उमेदवाराची संधी

वर्धा (प्रतिनिधी)
वर्धा नगरपरिषद निवडणुकीसाठी यंदा नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी ही जागा आरक्षित असल्याने अनेकांनी तयारी सुरु केली आहे. काही प्रमुख पक्षांकडून, तर काही अपक्ष पातळीवर लढण्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.माजी नगराध्यक्ष अतुल तारारे पुन्हा मैदानात उतरणार का, हा प्रश्न कायम आहे. ते संघाचे जुने कार्यकर्ते असले तरी स्थानिक आमदार आणि काही नगरसेवक त्यांना फारसे पसंत नसल्याचे दिसते. त्यामुळे भाजपच्या गोटात गोंधळाचे वातावरण आहे.दरम्यान, प्रशांत बुर्ले यांच्या नावाची चर्चाही गती घेत आहे. परंतु वर्धेकर मतदार त्यांना पसंती देतील का, यावरही संभ्रम आहे. दुसरीकडे, कुणबी समाजातील उमेदवार या शक्यतेची चर्चा वेगाने पसरत आहे. कुणबी-तेली या समीकरणात काँग्रेसचा उमेदवार पुढे जाण्याची भीती भाजपला वाटते, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.अशातच भाजपच्या वर्तुळात वर्धा नगरपरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर हे मजबूत पर्याय म्हणून चर्चेत आले आहेत. अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले ठाकूर यांना दोन्ही समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रभावी प्रभागासोबतच इतर नगरसेवकांशी असलेले सुसंवाद संबंध हे त्यांच्या बाजूने जातात.ठाकूर हे मेघे गटाशी निकट संबंध असलेले कार्यकर्ते समजले जातात. त्यामुळे सर्वजण मन मोठं करून त्यांना उमेदवारी दिल्यास अल्पसंख्यांक समाजालाही सकारात्मक संदेश मिळेल, असे निरीक्षकांचे मत आहे. सातत्याने लोकांमध्ये राहणारे, सर्व समाजात मिसळणारे आणि शांत परंतु परिणामकारक शैलीत काम करणारे नेते म्हणून प्रदीप ठाकूर यांची ओळख आहे. त्यामुळे वर्धा भाजपला विजय मिळवून देऊ शकणारा चेहरा म्हणून त्यांचं नाव जोरात घेतलं जात आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles