
वर्धेचे पत्रकार भिकारी आहेत ? नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याचा वादग्रस्त प्रकार!
वर्धेचे पत्रकार भिकारी आहेत ? नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याचा वादग्रस्त प्रकार!
जाहिरात वाटप करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे धक्कादायक वक्तव्य
वर्धा (मंगेश चोरे पाटील):
वर्धा नगरपरिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत असताना आता एका नवीन वादाने डोके वर काढले आहे. दिवाळी जाहिरात वाटपाच्या निमित्ताने पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेत पत्रकार जाहिरात वाटपासाठी गेले असताना संबंधित महिला कर्मचारी म्हणाल्या – “आपल्या वर्धेतले पत्रकार भिकारीच आहेत बा!” असे वाक्य त्यांनी उच्चारले. हे वक्तव्य ऐकून उपस्थित सर्व पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सदर महिला कर्मचाऱ्यांच्या मागे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहेत, असा संशय व्यक्त होत आहे. कारण जाहिरात वाटपासाठी मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाची जुनाट यादी त्या महिलेला दिली असल्याचे समजते. ही यादी अनेक वर्षांपासून अद्ययावतच करण्यात आलेली नाही. यात अनेक प्रचलित वर्तमाने आणि ऑनलाइन माध्यमांचे प्रतिनिधींची नावेच नाहीत.पत्रकारांवर “भिकारी” असा शिक्का मारणारे अधिकारी आणि कर्मचारी नेमके कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, हा प्रश्न आता उभा राहतो आहे. कोट्यवधी रुपयांचा गोंधळ आणि गभनाच्या आरोपांमध्ये गुरफटलेले नगरपरिषदेचे अधिकारी स्वतःवरून लक्ष हटवण्यासाठी पत्रकारांना लक्ष्य करत आहेत का, अशी चर्चा शहरात सुरू आहे.भ्रष्टाचाराचे आरोपी कोण आणि भिकारी कोण?
हा प्रश्न आता वर्ध्यातील जनतेच्या मनात घर करू लागला आहे. या वादाचा पुढील भाग आणि संबंधित मुख्याधिकाऱ्यांची भूमिका — वाचा पुढील अंकात…