
भेसळयुक्त इंधन विक्रीमुळे ग्राहक नाराज – दिवाळीत पेट्रोल पंप ओस पडला
भेसळयुक्त इंधन विक्रीमुळे ग्राहक नाराज – दिवाळीत पेट्रोल पंप ओस पडला
ग्राहकांनी घेतली गंभीर दखल, प्रशासनाकडून तपासणीचे संकेत हेच ते गिरीष राजपाल पेट्रोलपंपाचे मालक,आणि डिझेल पेट्रोल चे तस्कर..
वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील):
महिला आश्रम परिसरातील गिरीष राजपाल यांच्या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल विकले जात असल्याचे प्रकार नुकतेच उघडकीस आले आहेत. या प्रकारामुळे अनेक वाहनांचे इंजिन खराब झाले असून, वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात देखील या पंपावर ग्राहकांची वर्दळ दिसून आली नाही.सदर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच पंपावर पेट्रोल भरल्यानंतर अनेक दुचाकी, चारचाकी वाहने बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर ग्राहकांनी या पंपाकडे पाठ फिरवली आहे.प्राप्त माहितीनुसार, इंधनात इथेनॉलच्या निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त भेसळ करण्यात येत असून, त्यामुळे इंजिनवर विपरीत परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे वर्धा प्रशासनाच्या वाहनांत देखील या पंपावरूनच डिझेल भरले जात असल्याची माहिती उघड झाली आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अवैध डिझेल-पेट्रोल विक्रीचे प्रमाण वाढल्याने अशा प्रकरणांची सखोल तपासणी गरजेची बनली आहे.जनतेने बातमीची दाखल घेऊन या पंपावरून पेट्रोल भरणे टाळले आहे.