

दिशा नरेश होलानी यांचा यारो फाउंडेशन व स्वाभिमानी युवा व्यापारी मित्र मंडळातर्फे भव्य सत्कार
प्रतिनिधी(वर्धा)नुकत्याच जाहीर झालेल्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत दिशा नरेश होलानी हिने ३०० पैकी १७२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल यारो फाउंडेशन व स्वाभिमानी युवा व्यापारी मित्र मंडळातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष अजय मंशानी, सुमित मुणोत, रवि गनवानी, तसेच सहकारी सदस्य राहुल राठी, अंशवीन जैन, मृणाल राठी, सुमित कोठारी, अंकुर जैन, अभिजीत सबाने, अॅड. संकेत लांबट, डॉ. संकल्प हुमने, डॉ. हर्षल भीरसागर, दिपीक डोडानी, अंकित सिंघानिया, ऋषभ जाऊ, योगेश शर्मा, सुरज बलवानी, झितीज जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.