
सण-उत्सव पार्श्वभूमीवर सावंगी मेघे पोलीस ठाण्याचा रूट मार्च
सण-उत्सव पार्श्वभूमीवर सावंगी मेघे पोलीस ठाण्याचा रूट मार्च
वर्धा, दि. 24 जुलै – मौजा सालोड हिरापुर आणि परिसरात येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच दारूबंदीची अंमलबजावणी व शांतता राखण्याच्या उद्देशाने आज सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन सावंगी मेघे अंतर्गत रूट मार्च आयोजित करण्यात आला.हा रूट मार्च गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आला. यामध्ये एकूण 3 अधिकारी आणि 35 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. स्थानिक नागरिकांनी देखील रूट मार्चचे स्वागत करत सहकार्य दर्शवले.पोलीस प्रशासनाने आगामी काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला. रूट मार्चमुळे गावात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.