
तो उपसंपादक कोण? जो पोलिस अधीक्षकांच्या निनावी तक्रारी करण्याच्या उचापती करतो!
तो उपसंपादक कोण? जो पोलिस अधीक्षकांच्या निनावी तक्रारी करण्याच्या उचापती करतो!
वर्धा (प्रतिनिधी):
वर्धा जिल्ह्यात नाहक उचापती, खोट्या तक्रारी आणि अधिकारी बदनाम करण्याचे उद्योग काही नवीन राहिलेले नाहीत. हरामखोरी करणारे आले की मित्र होतात.आणि प्रामाणिकांच्या काड्या होतात.काही दिवसांपूर्वी एका मृत व्यक्तीच्या नावावर तक्रार दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर येत आहे – निनावी तक्रारींच्या सल्ल्याचा, आणि त्या मागे असलेल्या पत्रकाराच्या भूमिकेचा.
प्राप्त माहिती नुसार, वर्ध्यातील एका प्रसिद्ध दैनिकाच्या उपसंपादकाने निनावी तक्रारीच्या सल्ला देणे सुरू केले अशी विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे.आहेत. हे महाशय, मागील काळात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेल्या एका अधिकाऱ्याचे निकटवर्ती असल्याचे बोलले जाते. त्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात या उपसंपादकाचा प्रभाव अधिक होता. मात्र, सध्याचे पोलिस अधीक्षक कोणत्याही प्रकारचा दबाव स्वीकारत नसल्याने या उपसंपादकाची नाराजी उफाळून आली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हा उपसंपादक अनेकांना निनावी तक्रारी करण्याचा सल्ला देतो. विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकण्यासाठी निनावी अर्जांची मालिकाच सुरू करण्यात आली आहे. या तक्रारी कोण करत आहे हे स्पष्ट झाले असून, त्यामागील सूत्रधार अद्यापही नामनिराळा आहे.
या सर्व प्रकारांमुळे वर्धा पोलिस दलात संभ्रमाचे वातावरण आहे. कार्यरत पोलिस अधीक्षकांना बदनाम करण्याचे आणि त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हे सर्व प्रकार नेमके कुणाच्या इशाऱ्यावर केले जात आहेत, याचा शोध लागणे आता गरजेचे झाले आहे.जिल्ह्यातील प्रशासनात आणि पत्रकारितेत अशा प्रकारच्या कारस्थानांनी खळबळ उडाली असून, लवकरच सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. जनतेनेही अशा अफवांपासून सावध राहावे आणि सत्य समोर येईपर्यंत कुणाच्याही बदनामीस हातभार लावू नये, असे आवाहन सुज्ञांनी केले आहे.