
बातमी प्रसिद्ध होताच वर्धा पोलिसांचा तात्काळ धडक तपास
बातमी प्रसिद्ध होताच वर्धा पोलिसांचा तात्काळ धडक तपास
प्रकाशित झालेली हीच ती बातमी
वर्धा (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जपत साप्ताहिक पंचनामाने काल पावणार गावात सुरू असलेल्या डिझेल-पेट्रोल विक्रीबाबत धडक बातमी दिली. ही बातमी वाचताच वर्धा जिल्हा पोलिस यंत्रणा तात्काळ हलली आणि आजच गुन्हे शाखेचे पथक तसेच सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या पावणार बीट जमादारांनी घटनास्थळावर धडक दिली.
सदरच्या हॉटेल चालकाला पोलिसांनी स्पष्ट शब्दांत तंबी देऊन, पुढील काळात असे प्रकार आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा दिला. या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसांचे सजग व जबाबदार स्वरूप अधोरेखित झाले आहे.
गत काही महिन्यांत जिल्हाभरात डिझेल-पेट्रोलच्या अवैध विक्रीवर पोलिसांनी प्रभावी अंकुश ठेवला आहे. सावंगी परिसरातील गोरज्या दिवसांचे अवैध व्यवहार पूर्णपणे थांबवण्यात आले असून, आज बहुतेक ठिकाणी असे धंदे बंद झाले आहेत. मात्र, अजूनही काहीजण गुपचूप व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करीत असल्यास पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचून दाखवत आहेत.
सेलू परिसरातील एका हॉटेलच्या मागील भंगार दुकानात सुरू असलेल्या संशयित धंद्याची पोलिसांच्या रडारवर खात्रीशीर नोंद आहे. येथून मिळणारे इंधन काही पेट्रोल पंपांवर विकले जात असल्याची शंका असून, यावर पुढील काळात अधिक कठोर तपास व कारवाई होणार आहे.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये दिलासा व समाधान पसरले असून, कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिस सातत्याने दक्ष आहेत, याचा ठोस पुरावा मिळतो. वर्धा जिल्हा पोलिसांची ही तत्परता निश्चितच जनतेच्या विश्वासाला बळकटी देणारी ठरली आहे.