
शेखर शेंडे यांची हवा असली तरी तीवा उलटा. चौथ्यांदा पडण्याचा विक्रम करते की काय ? जनतेत चर्चा.
शेखर शेंडे यांची हवा असली तरी तीवा उलटा.
चौथ्यांदा पडण्याचा विक्रम करते की काय ? जनतेत चर्चा.
वर्धा(मंगेश चोरे) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांचा आजवर तिनदा दारून पराभव झाला चौथ्यांदा त्यांना काँग्रेस पक्षाने मोठ्या उमेदीने उमेदवारी दिली आहे. हल्ली तर लोकांची सहानुभूती असल्याचे वातावरण होते. परंतु लवकरच हे वातावरण निवळत चालले आहे .उमेदवारी मिळाल्याबरोबरच शेखर शेंडे यांना आमदार झाल्यासारखे वाटत असल्याने उमेदवारी मिळतात हवेत उड्या मारण्याच्या सवयीने शेखर शेंडे यांचे जवळ असलेले सुद्धा दूर जात आहे. वर्धा विधानसभेमध्ये अत्यंत आणीबाणीची ही निवडणूक असून मोठ्या प्रमाणात तेली कुणबी जातीचे विभाजन होणार आहे यात मागासवर्गीय मातम्बर उमेदवार उभे असल्याने मोठ्या प्रमाणात मताची विभागणी होणार आहे असे असताना शेखर शेंडे यांचा प्रचार कार्यक्रम म्हणजे आर्वी ची शकुंतला गाडी असा आणि अविर्भावात चालू असल्याने शेखर शेंडे यांचा यावेळी सुद्धा दारुण पराभव होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली. पक्षांतर्गत शेंडे यांना असलेला जबरदस्त विरोध अंतर्गत आपले काम करत आहे शेंडे हे निवडून येऊ नये याकरिता सुद्धा त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे असे असताना शिखर शेंडे यांनी काही निवडकच मंडळींना हाताशी धरून आपली यंत्रणा चालवल्याने त्यांच्याबद्दलचा वाढलेला आत्मविश्वास कमी होऊ लागला आहे शेंडे निवडून आल्यानंतर आपल्या हातात येणार नाही अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा तेच होण्याची शक्यता दिसून येत आहे. ग्रामीण भागात ज्याप्रमाणे स्वर्गीय प्रमोद शेंडे यांचा प्रचार कार्यक्रम चालायचा प्रत्येकाला सोबतीला घेऊन गावागावात सहानुभूतीचे वातावरण निर्माण व्हायचे अशा प्रकारचा कुठलाही कार्यक्रम शेखर शेंडे हाताळू शकत नसल्याने गावातून सुद्धा शेखर शेंडे यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसून येत नाही.