एक लाख युनिटपेक्षा जास्त रक्तसंकलनाचा विक्रम – वर्धा ब्रह्माकुमारिज सेवाकेंद्राचे विशेष योगदान

एक लाख युनिटपेक्षा जास्त रक्तसंकलनाचा विक्रम – वर्धा ब्रह्माकुमारिज सेवाकेंद्राचे विशेष योगदान

वर्धा : ब्रह्माकुमारिज विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त (२५ ऑगस्ट २०२५) तसेच विश्वबंधुत्व दिनाच्या औचित्याने भारतासह नेपाळभर एक भव्य रक्तदान महाअभियान राबवण्यात आले. या उपक्रमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.वर्धा ब्रह्माकुमारिज सेवाकेंद्रामार्फत माधुरी दिदी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ७७ दात्यांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते –मा. डॉ. पंकज भाऊ भोयर (विधायक व पालकमंत्री, वर्धा)डॉ. स्वप्निल बेले (जिल्हा आरोग्य अधिकारी)अनिलजी नरेडी (लायन्स क्लब गांधी सिटी)श्री. आशिष पोहणे (अध्यक्ष, लायन्स क्लब गांधी सिटी, वर्धा)श्री. प्रकाशभाऊ खंडारजी (अध्यक्ष, दक्ष फाउंडेशन, वर्धा)डॉ. अंगद मिस्कीन, डॉ. गाठे, डॉ. उल्हास घोटकर, श्री. दंडारे तसेच सेवाकेंद्र संचालिका मधु दीदी, अपर्णा दीदी, रेणु दीदी, रीना दीदी, नूतन दीदी, तृप्ती दीदी, लीना दीदी, वैष्णवी दीदी, स्नेहा दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगीडॉ. पंकज भोयर यांनी शिबिराच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.डॉ. स्वप्निल बेले यांनी रक्तदानाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले.अनिल नरेडी यांनी “रक्तदान करून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकलो तर त्यापेक्षा मोठे पुण्यकार्य नाही” असे मत व्यक्त केले.माधुरी दिदी यांनी दादी प्रकाशमणी यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या जीवनमूल्यांवर प्रकाश टाकला.रक्तदात्यांचा सर्टिफिकेट व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. वर्धा तसेच परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles