भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते दादाराव केचे यांची नाराजी उफाळली : आर्वीच्या विकासासाठी अन्याय झाल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते दादाराव केचे यांची नाराजी उफाळली : आर्वीच्या विकासासाठी अन्याय झाल्याचा आरोप

वर्धा (प्रतिनिधी)
आर्वी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते दादाराव केचे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. काल मंजकावरील भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय जनता पक्षाने आपल्यावर अन्याय केला असून हा काही खोटा आरोप नसून शुद्ध सत्य आहे.

केचे यांनी ठाम शब्दात स्पष्ट केले की, “गेल्या कित्येक वर्षांपासून आर्वीचा विकास ठप्प आहे. आजही आर्वी मतदारसंघ भकास अवस्थेत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो, परंतु वरिष्ठ पातळीवरील निर्णयांमुळे आमच्यावर अन्याय झाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “पूर्वी विरोधक आमचा विरोध करायचे, पण आज आमच्या स्वतःच्या पक्षातच विरोधक निर्माण झाले आहेत. आम्ही जेव्हा पक्षाला कोणी विचारत नव्हते, तेव्हा भगवा उपरणे खांद्यावर घेऊन आम्ही लोकांच्या सेवेत होतो. आज पक्षाचे दिवस आले, सत्ता आली, मात्र आमच्यासाठी उपेक्षा का? हे अन्यायकारक आहे.”

दादाराव केचे हे आर्वी मतदारसंघातून सर्वाधिक काळ आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मंत्रीपद निश्चित असल्याची जनतेत व कार्यकर्त्यांत अपेक्षा होती, मात्र त्यांचा ‘पत्ता कट’ केल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत व स्थानिक जनतेत नाराजीचा सूर उमटला आहे.

केचे यांचा आवाज हा फक्त व्यक्तिगत नाही तर आर्वीच्या जनतेच्या विकासाच्या अपेक्षांशी निगडित आहे, असे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. “आम्ही कुणालाही जुमानणारे नाही, अन्याय सहन करणार नाही. आमची नाराजी ही काही साधी नाही. जर पक्षाने गांभीर्याने घेतले नाही तर आर्वीचा विकास पुन्हा थांबणार, ही वस्तुस्थिती आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

त्यांच्या या जाहीर नाराजीमुळे पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात आर्वीतील राजकारणाला नवीन वळण लागणार यात शंका नाही.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles