
मानिकगड सिमेंट कंपनीतील सुरक्षा रक्षकांचा विजय : शिवसेनेच्या पाठबळामुळे यश
मानिकगड सिमेंट कंपनीतील सुरक्षा रक्षकांचा विजय : शिवसेनेच्या पाठबळामुळे यश
चंद्रपूर प्रतिनिधी – मनोज गोरे
चंद्रपूर,
मानिकगड सिमेंट कंपनी येथील सुरक्षा रक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. आज केंद्रीय कामगार श्रम आयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सुरक्षा रक्षकांचा कामाचा कालावधी 12 तासांवरून 8 तास करण्यात आला. यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बैठक केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त श्री. प्रशांत सिंघ यांच्या उपस्थितीत, एस.आय.एस. सेक्युरिटी फोर्सचे पदाधिकारी राकेश सिंग यांच्या सहभागाने पार पडली. बैठकीचे मुख्य मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे यांनी केले. यावेळी कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड, गडचांदूर शहर प्रमुख विकी राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख हजारे यांनी यावेळी सांगितले की,
“शिवसेना हा पक्ष कामगार, शेतकरी आणि महिलांसाठी सतत झटणारा पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच खरी शिवसेनेची ओळख आहे. आगामी काळातही कामगारांच्या हक्कांसाठी हा संघर्ष सुरू राहील.”
बैठकीत सुरक्षा रक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याचा निर्धार करण्यात आला. मूळ वेतन, वेज बोर्डानुसार तासिका वेळ, तसेच अन्यायकारक शर्तींविरुद्ध न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.
या ऐतिहासिक बैठकीत शिवसेना पदाधिकारी –
राकेश राठोड, आशिष नामेवाड, विक्की राठोड, अरविंद गोरे, मोरेश्वर नक्षीने, राजू बघेल, सुयोग अवताडे, सुरेश खापर्डे, मनोज खांडेकर यांच्यासह शेकडो सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सुरक्षा रक्षकांपैकी परमेश्वर पिदुरकर, ईश्वर विदुरकर, बाळू राठोड, मोहन जाधव, विवेक नगराडे, नंदलाल चौधरी, प्रवीण राठोड, संतोष रुईवाडे, मिलिंद सुखदेवी, संतोष महुर्ले, अंकुश सांगोळे, निलेश चिंचोलकर, अनिल चव्हाण, महिंद्रा आत्राम, प्रवीण चंदेलवार, मिथुन निमगडे आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.
ही लढाई कामगारांची होती आणि विजयही कामगारांचाच झाला असून शिवसेनेच्या पाठबळामुळे मिळालेले हे यश ऐतिहासिक ठरले आहे.