विलास कांबळे विधानसभेच्या रिंगणात


वर्धा( प्रतिनिधी ) वर्धा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असताना वर्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे कांबळे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असणार असून काल पार पडलेल्या लक्ष्मी सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपले समर्थन दिले मागासवर्गीय समाजाच्या बहुजनांच्या विकासाकरिता अहोरात्र झटणारे विलास कांबळे हे या निवडणुकीत एक महत्त्वाचा उमेदवार ठरणार असल्याचे आताच चर्चेत आहे काल झालेल्या सभेमध्ये कांबळे यांनी जनतेच्या दृष्टीने आपली उमेदवारी असून आपला कोणत्याही पक्षाशी कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे कोणत्याही प्रकारच्या आपल्या संदर्भात वावड्या उठवल्यास कोणीही त्याकडे लक्ष न देता माझी उमेदवारी ही गोरगरिबांच्या हिताकरिता तसेच विकासाकरिता आहे आपण जिल्हा परिषदेत असताना अनेक कामे केली प्राथमिक स्वरूपात बोरगाव सावळी येथील सरपंच पदापासून ते वर्धा पंचायत समितीचे उपसभापती म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झालेले विलास कांबळे आजही जनतेच्या पसंतीचे उमेदवार ठरू शकते अशी या ठिकाणी चर्चा होती.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles