
राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा नागरी सत्कार
राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा जाहीर सत्कार
वर्धा (प्रतिनिधी)
वर्धा ज़िल्ह्याचे नामदार पंकजभाऊ भोयर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर प्रथमच वर्धेत आगमन होत आहे. आपल्या सर्वांसाठी आनंद आणि अभिमानाचा हा क्षण साजरा करण्यासाठी व मा. मंत्रिमहोदयांचा स्वागत / सत्कार करण्यासाठी वर्धेतील सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची *”नागरी सत्कार समिती”* गठीत झाली आहे.
*रविवार दि. 22 डिसेंबर 2024* रोजी वर्धेतील ऐतिहासिक *सोशालिस्ट चौकात संध्याकाळी 5:00 वाजता* मा. ना. पंकजभाऊ भोयर यांचा *भव्य नागरी सत्कार* आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे ही विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.