
सालोड परिसरात सापडले मृत प्रेत
सालोड परिसरात सापडले मृत प्रेत
सावंगी (प्रतिनिधी) : सालोड तलाव परिसरात आज एका युवकाचे प्रेत आढळून आले. मृतकाचे नाव विशाल विठ्ठल कालार (वय अंदाजे २५) असे समजते.
प्राथमिक अंदाजानुसार, सदर युवकाची हत्या करून त्याचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.