
आमदार साहेब जाहिर सभेत सांगा! समृद्धी महामार्गावरील मृतकांना काय दिले.
भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेला रोजाने
लोक येईना ?
आमदार साहेब जाहिर सभेत सांगा! समृद्धी महामार्गावरील मृतकांना काय दिले.
वर्धा (प्रतिनिधी) मागील दहा वर्षापासून जनतेला मूर्ख बनवून राजकारणाचा आस्वाद घेत असलेले आमदार पंकज भोयर यांच्या आज जाहीर सभे करिता लोकांनी पाठ फिरवली आहे. कट्टर समर्थक व्यतिरिक्त इतरत्र लोकांना सभे करिता रोज दिला जात असून सुद्धा कोणी येण्यास तयार नाही. यावरून भोयर यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे स्पष्ट आहे. ग्रामीण भागातील जनतेने ठाम मत बनवले असून यावेळी बदल हवा अशी सर्वत्र चर्चा आहे .त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पंकज भोयर यांचा डोंगा बुडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पंकज भोयर यांनी कोणते ठोस काम केले. यावर सर्वांनी लक्ष वेधले असून आम म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध असणारा माणूस मात्र सदर माणूस आम नसून अपॉइंटमेंट मास्टर आहे हे दहा वर्षात जनतेच्या लक्षात आले. मागील काळात समृद्धी महामार्गावर वर्धा शहरातील विद्यार्थ्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले सांगा आमदार साहेब तुम्ही काय केले? दिलेले खोटे आश्वासन आजही पूर्ण झाले नाही. मृतकांच्या परिवाराला कित्येक वेळा रस्त्यावरून मोर्चे काढावे लागले. सांगा आमदार साहेब आपण काय केले? आमदार पंकज भोयर यांनी जनहिताचे कोणती कामे केले नसून स्वतःचा स्वार्थ साधला अशी जनतेत ओरड आहे त्यामुळे पंकज भाऊ यांच्याविरुद्ध तीव्र नाराजी दिसून येत आहे.