वर्धा जिल्ह्यातील पोलिस खात्यात खळबळजनक बदल!

अमाप संपत्ती कमावलेल्या पोलिस अधिकाऱ्याची वाहतूक शाखेत बदली


वर्धा (प्रतिनिधी) वर्धा जिल्ह्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कापडे यांची अचानक वाहतूक शाखेत सहाय्यक म्हणून बदली करण्यात आली आहे. या बदलामुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ माजली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कापडे हे काही काळ वर्ध्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्या खेम्यातील ‘महत्त्वाचे वसुली अधिकारी’ म्हणून ओळखले जात होते. प्रशासनातील गणित जुळविण्याचे कामही त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. त्यांना यापूर्वी सावंगी पोलिस ठाण्याचा.पदभार देण्यात आला होता, मात्र हे बदली प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरत आहे.थेट आदेश पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा?
विश्वसनीय माहितीप्रमाणे, तत्कालीन पोलिस अधीक्षक हसन यांनी सावंगी ठाण्याचे ठाणेदार दीपक वानखेडे यांना स्थानिक पत्रकार मंगेश चोरे (पाटील) यांच्या घरी “बंदूक किंवा गांजा” ठेवून गुन्हा दाखल करण्याचा तोंडी आदेश दिला होता. मात्र वानखेडे यांनी हा खोटा आदेश मान्य न करता, “बदली करा पण खोटं काम करणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी, वानखेडे यांची अवधी संपण्यापूर्वीच बदली करण्यात आली आणि त्या ठिकाणी पुन्हा कापडे.यांची नियुक्ती करण्यात आली.
सीसीटीव्हीने वाचवले, पण प्रयत्न थांबले नाहीत!
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार चोरे यांच्या घरी काहीतरी बेकायदेशीर टाकण्याचा प्रयत्न कापडे यांनी केला. मात्र घराच्या सभोवताली लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे. कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. याच दरम्यान दुपारी एकदा कापडे हे घराजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळले आणि त्याचे फुटेज सुद्धा रेकॉर्ड झाले आहे. हे फुटेज लवकरच उच्च न्यायालयात पुरावा म्हणून सादर होणार असल्याचे समजते.
कोट्यवधींची माया, बोगस बियाणे प्रकरण, लाचखोरीचे पुरावे बाहेर
कापडे यांच्यावर जिल्ह्यातील किमान दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती.जमविल्याचे आरोप आहेत. सेलू तालुक्यातील बोगस बियाणे प्रकरणात. तब्बल ६० लाख रुपये नगद हडप केल्याची विश्वसनीय माहिती असून, याचे काही पुरावेही उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे.
तसेच सावंगी परिसरातील डिझेल-पेट्रोल धंद्यातून दरमहा लाखो रुपयांची लाच गोळा केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सगळ्या प्रकरणांनी जिल्ह्यात पोलीस खात्याची नाचक्की होत असून, अनेकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles