वर्धेकर मनोज भोयर शब्द साहित्य संमेलनाचे उद्घाटक
वर्धेकर मनोज भोयर शब्द साहित्य संमेलनाचे उद्घाटक
सिंगापूर येथे 14 ते 18 जानेवारीपर्यंत विविध दर्जेदार सत्रांचे आयोजन
वर्धा (मंगेश चोरे) वर्धा. शब्द परिवारातर्फे सिंगापूर येते शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन 14 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोजित आहे. अमरावतीच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना संमेलनाध्यक्ष, तर मूळचे वर्धेकर ज्येष्ठ पत्रकार मनोज भोयर उद्घाटक राहणार आहेत. त्यांच्या उद्घाटकीय भाषणाने या संमेलनाचा प्रारंभ होणार आहे.
यावेळी रजिया सुलताना यांची मुलाखत ज्येष्ठ कवयित्री शशी डंभारे घेणार आहे. याशिवाय दोन कवी संमेलन आयोजित आहेत. महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्री सहभागी होत आहेत. वेगवगेळ्या विषयांवर परिसंवाद, प्राध्यापकांच्या शोध निबंधांचे सादरीकरणही होणार आहे. मराठीतून समजून घ्या सिंगापूर, ‘सिंगापूर देशाची जडणघडण’ या विषयावर मुंबईचे ऍड. सतीश बोरुलकर यांचे व्याख्यान हे श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘पुढच्या पिढीच्या दृष्टीने भारत आणि सिंगापूर’ या विषयाला अनुसरून दिल्लीच्या सुहानी राणा, मुंबईच्या साक्षी डंभारे आणि अहमदनगरच्या अंजली खोडदे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. विविध दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनसुद्धा या संमेलनात होणार असल्याचे ‘शब्द’ परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार यांनी सांगितले. सहभागी रसिक श्रोत्यांसाठी वर्ध्याच्या ज्योती भगत यांच्या खुमासदार निवेदनासहित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सिंगापूर शहराची सफर हे या संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे.