
वर्धा जिल्ह्यावर पोलिस महानिरीक्षक साहेबांची करडी नजर.
वर्धा जिल्ह्यावर पोलिस महानिरीक्षक साहेबांची करडी नजर.अनेक अधिकाऱ्यांचे बँड वाजण्याची शक्यता ? अब..आएगा मजा…
वर्धा(प्रति) नागपुर परिक्षेत्र नागपुर च्या पोलिस महासंचालकांनी वर्धा जिल्यातील ठीक ठिकाणच्या अवैध व्यावसायिकांची जंत्रीच गोळा केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.जिल्ह्यात अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याचे चित्रीकरण आपल्या विशेष टीम कडून प्रत्यक्ष जाऊन केले आल्याची माहिती असून.जिल्यातील सर्वाधिक सेलू परिसरात सतत दोन दिवस विशेष अधिकारी वर्गातील मंडळी जिल्ह्यात ठाण मांडून होती.सेलू परिसरात दारू,जुगार,डिझेल पेट्रोल असे अनेक चालू धंद्यांवर कोण किती पैसे घेऊन.परवानगी देतात.पैसे कुणाच्या माध्यमातून दिले जातात.अशी अनेक प्रकारची चौकशी आलेल्या टीम कडून करण्यात आल्याचे समजते. प्राप्त अहवाल पुढील काळात कुणाचा बळी घेणार .हे मात्र सांगणे कठीण असले तरी.काही निवडक अधिकारी मात्र रडारावर येण्याची शक्यता आहे. यातील काही हप्तेखोर अधिकाऱ्याचे काय होणार ? कोणती कारवाई कुणावर होणार? अधिकारी आणि जबाबदार कर्मचारी उघडे पडणार की काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे वर्धा जिल्हात
गोषवारा काढत असलेल्या या पथकाची कुणालाच भानक लागली नाही हे विशेष.