
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मूलभूत अधिकार नाकारणारे ….. ॲड अर्चना पेठे
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मूलभूत अधिकार नाकारणारे
….. ॲड अर्चना पेठे
वर्धा ,(प्रति)ग्रामीण सार्वजनिक वाचनालय ,डेहनकर नगर, वर्धा येथे दिनांक 27 जुलै 2025 रोजी सत्यशोधक समाज व समविचारी संघटनांच्या वतीने सत्यशोधक कट्टा या उपक्रमा अंतर्गत,,महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाचे वास्तव ,,याविषयीची मांडणी करतांना ॲड अर्चना पेठे म्हणाल्या ,या कायद्याने नागरिकांच्या भाषण ,सरकारच्या ध्येय धोरणावर टीका ,चुकीच्या निर्णया विरुध्द आंदोलन करणे ,आपल्या न्याय मागण्यांकरिता मोर्चे उपोषण करणे.यासारख्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ शकते.याविधेयकात कुणीही हा अत्यंत धोकादायक शब्द वापरलेला आहे त्यात.कोणत्याही शब्दाची स्पष्ट व्याख्या देण्यात आलेली नाही.हा कायदा नक्षवाद नष्ट करण्यासाठी केला जात आहे
असे म्हटले जात असले तरी त्यात या कायद्यामुळे नक्षलवाद हा शब्द कुठेही आलेला नाही.फक्त कुणीही हाच शब्द वापरलेला आहे.यात बेकायेशीर कृत्य याची सुध्दा स्पष्ट व्याख्या करण्यात आलेली नाही.
या कायद्यामुळे सरकारवर टीका करणाऱ्या सामाजिक संघटना ,पथनाट्य कलाकार, हास्य कवी इत्यादी लोक नामशेष होऊ शकतात.हा कायदा पत्रकार,माहितीच्या अधिकारात काम करणारे कार्यकर्ते,परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, इत्यादींना असुरक्षित पणाची भावना निर्माण करते .
या कायद्यामुळे प्रचलित असलेले ipc.19,20,21,22 यानुसार मिळालेल्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ शकते.
असेही ॲड अर्चना पेठे म्हणाल्या.
कार्यक्रमाची भूमिका मांडताना डॉ.अशोक चोपडे म्हणाले की, बहुधा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदे केले जातात.परंतु चार पाच वर्षापासून अर्बन नक्षलवाद हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जात आहे.त्याची चर्चा लोकसभा व राज्यसभेतही झाली आहे. धर्म व जात प्रमाण मानणाऱ्या विचाराची सत्ता येते .तेव्हा धर्मा धर्मात ,जाती जातीत व्देष पेरण्याचे काम केले जाते .त्यामुळे प्रत्येकाच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण होते.
याप्रसंगी मा.रामकृष्ण सांबरे यांनी आपल्याला जर्मनीच्या प्रवासात आलेले अनुभव सांगितले, की तेथे रहदारीचे.नियम काटेकोरपणे पाळण्यात येते ,लोक परस्पर सहकार्य ,शांतता , स्नेह पूर्ण वागतात.
आपल्या विठ्ठलवारीचे अनुभव कथन करतांना मा.अजय भेंडे म्हणाले ,की वारीत कुठेही भेदाभेद दिसत नाही कुणीही कुणाला जात,धर्म कधीही विचारत नाही गरीब श्रीमंत असाही फरक पहावयास मिळत नाही प्रत्येक जण एकमेकात विठ्ठलाचे स्वरूप पाहतो व एकमेकांना ,,माऊली ,, म्हणत चालतो .
. …….कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उमाजी नाल्हे , अध्यक्ष,ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, होते .तर प्रमुख अतिथी म्हणून मा.उदयदादा मेघे ,व प्रतिभा जाधव हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड नंदकुमार वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्राचार्य जनार्दन देवतळे,गुणवंत डकरे,कपिल थुटे,राजेंद्र कळसाइत,विजय भुजाडे,अभिजित भेंडाले,प्राचार्य मिलिंद सवाई, डॉ नीरज केंढे,Dnyaneshwar ढगे इत्यादींनी अथक प्रयत्न केले.
कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.