वर्धा पोलिस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी घेतली दुकान खाली करण्याची सुपारी.मागासवर्गीय परिवारावर पोलिसांचा बेकायदेशीर अत्याचार.

वर्धा पोलिस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी घेतली दुकान खाली करण्याची सुपारी.मागासवर्गीय परिवारावर पोलिसांचा बेकायदेशीर अत्याचार.


वर्धा(प्रतिनिधी) वर्धा येथील मागासवर्गीय अनेक संघटना या प्रकरणात पुढे येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असुन. वाल्याचे वाल्मिक करण्याच्या प्रयत्नात वर्धा पोलिस अधिक्षक हे दारू विक्रेत्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात काम करतात.त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न करतात.आणि दारूचा धंदा सोडून समाजात प्रामाणिक वेवसाय करणाऱ्या मागासवर्गीय परिवाराला परत गुन्हेगार करण्याचा कार्यक्रम वर्धा पोलिस ठाण्यातील पोलिस सब इन्स्पेक्टर श्री. बानोद यांनी गेल्या चार दिवसा पासून चालवल्याचे पुढे आले आहे.ज्या प्रकरणात पोलिसांना अधिकार नाही त्यात बानोद यांनी तगडी रक्कम घेऊन दुकान खाली करण्याची सुपारी घेतली की काय?असा चालविला आहे.यापूर्वी बानोद यांनी.सुरेश पवार,राहुल पवार,याचे घर खाली करून दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.संपूर्ण अवैध्य धंदे बंद असल्याने जणू घर खाली करण्याचा धंदा जोपासला की काय असे चर्चेत आहे.
पोलिसांना कुणाचे दुकान खाली करण्याचे किंवा मकान खाली करण्याचे अधिकार नसतांना वर्धा पोलिसांनी चालविलेला प्रकार हा बेकायदेशीर आल्याने,वर्धा पोलिस ठाण्यातील यंत्रणा चांगलीच अडचणीत येईल असे चित्र दिसून येत आहे.
प्राप्त माहिती अशी की सेवाग्राम येथील अजय ताकसांडे यांनी वर्धा सोशलिस्ट चौकात ठाकरे यांचे घर किरायने घेतले होते.तीन वर्षा पासून रीतसर भाडे देत असताना अचानक ताकसांडे यांचे आणि ठाकरे यांच्यातील अग्रिमेंट संपले.पुढील अग्रिमेंट वाढविण्याकरिता डबल भाडे ठाकरे यांनी मागितले.त्यामुळे तत्काळ ही जागा खाली करणे शक्य नसल्याने दोन्ही बाजूने न्यायालयातून वकिलांनी नोटीस दिले.सदर मामला हा सिव्हिल स्वरूपाचा असताना.दिनांक २८/७/२०२५ ला वर्धा पोलिस ठाण्यातून विनोध ठमके पोलिस कर्मचारी यांचा ठाणेदार यांनी बोलावल्याचा फोन आला त्यामुळे ताकसांडे हे ठाण्यात गेले.त्या ठिकाणी बानोद यांनी काही कारण नसतांना मारहाण केली.ठाकरे यांच्या पत्नीची तक्रार घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.मात्र ताकसांडे यांनी तेथुन सटकून.थेट मंबई गाठून सदर प्रकार हा.मागासवर्गीय आयोगात प्रत्यक्ष जाऊन आपले बायान नोंद केले. काही मान्यवरांच्या भेटी घेऊन सविस्तर प्रकार व्यक्त केला,सदर मामला हा मानवाधिकार आयोगातही दाखल केला. यात पोलिसांचे सी सी टीव्ही फुटेज दाखल केले.सदर दुकानात लावलेले कॅमेरे पोलिसांनी काढून नेले.कॅमेरे करण्याचा पोलिसांना कोणता अधिकार आहे.हा स्पष्ट मागासवर्गीय परिवारावर अन्याय आहे.यामुळे हे प्रकरण चांगलेच पेटणार असल्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणात मोठा खुलासा असा दिसून येतो की सदर घर मालक ठाकरे याने सदरचे घर हे खोट्या कागदपत्रावर हडप केले असून . सेलसुरा येथेही असाच प्रकार केला परंतु हा प्रकार उघड झाला आणि ठाकरे याचा भांडा फोड झाला.क्रमशः वाचा


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles