
साक्री तालुक्यातील ख्रिस्ती समाजाच्या अन्यायाविरोधात बैठक आयोजित
साक्री तालुक्यातील ख्रिस्ती समाजाच्या अन्यायाविरोधात बैठक आयोजित
वारसा येथील अल्फा चर्चमध्ये १० जुलै रोजी सकाळी १० वाजता महत्वाची बैठक
प्रतिनिधी(मुंबई)साक्री तालुक्यातील ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्याय व दोषारोपाच्या पार्श्वभूमीवर, तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ, एक महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता अल्फा चर्च, वारसा येथे आयोजित करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार उपाध्यक्ष माननीय जोसेफ अण्णा मलबारी साहेब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस साक्री तालुक्यातील सर्व ख्रिस्ती संस्थांचे एरिया लिडर, पास्टरगण, आगेवाण, वडीलगण तसेच सामाजिक आणि राजकीय पुढारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून, ख्रिस्ती समाजाच्या हक्कासाठी मोर्चा काढण्याबाबतचा निर्णय यावेळी घेतला जाणार आहे. तसेच, संबंधित विषयावर मार्गदर्शन व दिशा माननीय जोसेफ अण्णा मलबारी साहेब स्वतः देतील.
जे सेवक याआधी झालेल्या सोमवारीच्या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनीही गुरुवारी नक्की उपस्थित राहावे, अशी खास सूचना देण्यात आली आहे.
सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सेवकांनी ही बैठक गांभीर्याने घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.