अनोळखी इसम मिळून आल्याने वृध्दाश्रमात दाखल – सावंगी मेघे पोलीसांची तत्पर कारवाई
अनोळखी इसम मिळून आल्याने वृध्दाश्रमात दाखल – सावंगी मेघे पोलीसांची तत्पर कारवाई
सदर इसम हरवलेला आहे.याला ओळखत असलेल्यांनी सावंगी पोलिस स्टेशन वर्धा येथे संपर्क करावा
अनोळखी इसम मिळून आल्याने वृध्दाश्रमात दाखल – सावंगी मेघे पोलीसांची तत्पर कारवाई
सदर इसम हरवलेला आहे.याला ओळखत असलेल्यांनी सावंगी पोलिस स्टेशन वर्धा येथे संपर्क करावा
वर्धा(पोलिस वार्ता)
सावंगी पोलिस स्टेशन अंतर्गत मौजा महाकाळ येथे अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील एक अनोळखी पुरूष बेवारस स्थितीत फिरताना आढळून आला. गावातील लोकांनी त्याला थांबवून ठेवले आणि तत्काळ पोलीस पाटील सौ. सविता अनिल थोटे यांनी याबाबतची माहिती पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांना दिली.सदर व्यक्तीची विचारपूस पोलीस कर्मचारी सफौ/विलास भेंडे (ब.न. २०६) व पोहवा/अमोल खाडे (ब.न. ७५४) यांनी केली. मात्र त्याला आपले नाव, गाव सांगता न आल्यामुळे त्याची ओळख पटली नाही. त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर इसमास ‘माहेर शांती निवास’, सेलू येथे दाखल करण्यात आले आहे.वय: अंदाजे ३५ ते ४० वर्षे,उंची: ५ फूट,
बांधा: सडपातळ रंग: सावळा,केस: काळे व काहीसे पांढरे,
दाढी: वाढलेली,वेषभूषा: मेहंदी रंगाचे टी-शर्ट, काळ्या रंगाचा पॅन्ट, काळ्या रंगाची सॅन्डल.सदर व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास आणि कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. सावंगी मेघेचे ठाणेदार श्री. पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.