
रेती चोरांवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई – ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
रेती चोरांवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई – ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा, दि. 07 ऑगस्ट 2025 – सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सायंकाळी पेट्रोलिंगदरम्यान पोलीसांना मुखबिरांकडून माहिती मिळाली की, हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH-32-A-8354) व ट्रॉली (क्र. MH-32-A-8355) मध्ये काळी ओलसर रेती भरून मौजा महाकाळ येथून साटोडा गावाच्या दिशेने बेकायदेशीररीत्या वाहतूक होत आहे.
त्यानुसार, पंच व पोलीस स्टाफसह महाकाळ-साटोडा रोडवर नाकेबंदी करून वाहन रोखण्यात आले. तपासात ट्रॅक्टर व ट्रॉलीची किंमत ₹7,00,000 व एक ब्रास (100 फूट) काळी ओलसर रेतीची किंमत ₹7,000 मिळून एकूण ₹7,07,000 किमतीचा मुद्देमाल आढळून आला. शासन महसूल चुकवून संगनमताने गौण खनिजाची (रेतीची) चोरी करून परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक रत्नपाल दत्ताजी ताजने (वय 24) व मालक योगेश मधुकरराव पोळ (वय 45, दोन्ही रा. महाकाळ, ता. जि. वर्धा) यांच्याविरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात अप. क्र. 631/2025 नुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, ठाणेदार व पोलीस कर्मचारी संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव व सुमित राठोड यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करीत आहेत.