
वारे जमाना : नाहक पोलिस अधीक्षकांना बदनाम करण्याचा कार्यक्रम
वारे जमाना : नाहक पोलिस अधीक्षकांना बदनाम करण्याचा कार्यक्रम
वर्धा (प्रतिनिधी : मंगेश चोरे)
जिल्ह्यातील पोलीस दलातील वातावरण गेल्या काही महिन्यांत लक्षणीय बदलले आहे. जवळपास सर्व अवैध धंदे बंद पडले आहेत. जे अजून सुरू आहेत तेही पोलिसांना पैसे देऊन चालविण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे जे भ्रष्ट कर्मचारी पूर्वी अवैध धंद्यातून “इझी मनी” कमवायचे, त्यांचे चांगलेच हाल झाले आहेत.मागील काळात कर्मचाऱ्यांची पैसा कमावण्याची पद्धत वेगळीच होती. “कारवाई करू”, “तडीपार होणार आहे”, “सदर प्रकरण गंभीर आहे” अशा धाकाने पैसा उकळला जायचा. एखादा धंदा सुरू ठेवण्यासाठी ठाण्यापासून मुख्यालयापर्यंत पैसा पोहोचवावा लागायचा. पत्रकारांना रोज रोज प्रेस नोट देऊन, कारवायांचा मोठा गाजावाजा करून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जायचा.सध्याच्या अधीक्षकांच्या कार्यपद्धतीत मात्र पारदर्शकता दिसते. खोट्या कारवायांचे प्रकार थांबले आहेत. ठाणेदारच पैसे कमविण्याच्या नादात नसल्याने कर्मचाऱ्यांची “इनकम” बंद झाली आहे. त्यामुळे काही कर्मचारी खवळले आहेत. रोजच्या घडामोडींच्या प्रेस नोट देणे मुद्दामहून थांबवणे, चांगल्या घडामोडी दडपून टाकणे, अशी पद्धत सुरू झाली आहे. उद्देश एकच – नवीन अधीक्षकांविषयी जनतेत भ्रम निर्माण करणे.
जिल्ह्यातील काही भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांची संपत्ती पाहिली तर ती एखाद्या सिनेमालाही शोभेल अशी आहे.महागड्या आलिशान गाड्या वीस पंचवीस एकर शेतीजमीन शहरात ठिकठिकाणी प्लॉट बायकोच्या अंगावर किलो किलो सोन्याचे दागिने मुलं परदेशी शिक्षण घेताना “एम.डी.” च्या आहारी
काही कर्मचाऱ्यांचा तर सावकारी व्यवसाय सुरू असून दहा-पंधरा टक्के व्याजाने पैसे वाटप केले जात आहे. हीच त्यांची “साइड बिझनेस” कमाई! परंतु अलीकडील कठोर कारवायांमुळे यांची आवक एकदम थांबली. त्यामुळे “बुडाला आग” लागल्यासारखी अवस्था झाली आहे.
मागील काळात पोलीस अधीक्षकांची भेट घेणे म्हणजे एखाद्या दवाखान्याची ओपीडी पार करण्यासारखे होते.प्रथम दोन महिला नाव नोंदवून घेत, फोटो काढत नंतर “खालच्या डॉक्टरां”कडे म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार तिथेच “प्रथमोपचार” – मोठ्या साहेबांपर्यंत तक्रार पोहोचायचीच नाही .यात गुलाबाची फुले घेऊन जाणाऱ्यांची विशेष लायन लागलेली असायची. अखेरीस अधिकारी खुर्चीत बसून पैसा मोजत आणि कर्मचारी गोरगरीबांना लुटत होते
आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. अधिकारी म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे कर्मचारी अशी शिस्त दिसते. कुणाच्या घरात घुसून बिनबुडाचे चेकिंग नाही, धाकदपटशाही नाही. खरी कारवाई, खरी माहिती आणि खरी शिस्त दिसते आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे.
काही भ्रष्ट कर्मचारी अधीक्षकांविषयी नाहक बदनामी पसरविण्याचा प्रयत्न करत असले, तरी वास्तव हेच की – कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी समाधानी आहेत. लोकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढतो आहे. भ्रष्ट कर्मचाऱ्यांची चैन-ऐश थांबली म्हणून त्यांचा आक्रोश वाढला आहे.
एकंदरीत, वर्ध्यात आज भ्रष्टाचारावर आळा घालणारे अधीक्षक आहेत आणि त्यांना बदनाम करण्याचा “प्रोग्राम” काहींच्या डोक्यात सुरू आहे, मात्र जनता या बदललेल्या पोलीसशाहीला सुखावलेली आहे.