शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलाच्या पाठीवर गाऱ्हाने

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलाच्या पाठीवर गाऱ्हाने

वर्धा (घोराड): परंपरेतला आनंद, पण व्यथा व्यक्त करण्याची अनोखी पद्धत! घोराड येथे आयोजित पारंपरिक बैलपोळा उत्सवात यावर्षी शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलांच्या पाठीवर घोषवाक्ये रंगवून संताप व व्यथा मांडल्या.

“लाडक्या बहिणीला हसू… शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू…”,
“आश्वासन दिले कर्जमाफीचे भारी, पण शेतकरी फिरतो दारोदारी…”,
“पिकाला भाव द्या, माझ्या मालकाला न्याय द्या…”,
“जनतेचा आदेश भारी, लोकशाहीत चालणार नाही मतदान चोरी…”

अशा तीव्र घोषणांनी शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले गेले.

शेतकऱ्यांचा मुख्य रोष कर्जमाफी, पिकाला हमीभाव (एमएसपी) आणि सरकारकडून मिळणाऱ्या केवळ आश्वासनांवर केंद्रित होता. “एमएसपीचा खरा भाव कधी मिळणार?” हा सवाल त्यांनी ठामपणे उपस्थित केला.

एक गाव – एक पोळा

घोराडसह परिसरातील अनेक गावांनी ‘एक गाव – एक पोळा’ या संकल्पनेतून सण साधेपणाने आणि एकोप्याने साजरा केला. घोराड येथे तब्बल आठशे बैलजोड्या सहभागी झाल्याने वातावरणात वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

कलात्मक माध्यमातून सामाजिक संदेश

घोराडचे शेतकरी सुनील पोहाणे यांची बैलजोडी सामाजिक विषयांतून लोकजागृती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा चित्रकार आशिष पोहाणे यांनी त्यांच्या कुंचल्यातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. बैलांच्या पाठीवर रंगवलेली घोषवाक्ये शेतकऱ्यांचे दुःख, शासनावरील टीका आणि न्यायाची मागणी यांचा आवाज ठरली.
या अनोख्या कल्पकतेमुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. परंतु, “शासनाला जाग कधी येणार?” हा शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles