
चांदुर रेल्वे येथे नव्या पोलिस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी
चांदुर रेल्वे येथे नव्या पोलिस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी
चांदुर रेल्वे, २५(प्रति)
चांदुर रेल्वे येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या पोलिस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकामाची आज पाहणी करण्यात आली.
या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हे स्टेशन आधुनिक सोयी-सुविधांसह नागरिकांसाठी खुले होणार आहे. इमारतीत प्रशस्त कार्यालयीन कक्ष, महिला तक्रार कक्ष, कैदी कक्ष, शस्त्रागार, बैठक कक्ष यांसह अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकीकृत नोंदी आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाहणीदरम्यान बांधकामाची गती, गुणवत्ता आणि नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. या इमारतीमुळे पोलिसांचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक व जनसामान्यांसाठी सुलभ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
या पाहणीत धामणगाव विधानसभेचे आमदार श्री. प्रतापजी अडसड, जिल्हा पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, गृहनिर्माण मंडळाचे अभियंते, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी व प्रकल्पाशी संबंधित कर्मचारी उपस्थित होते.