नागपूरचा भामटा अखेर तुरुंगात – डॉ. समीर पालटेवार अटक

नागपूरचा भामटा अखेर तुरुंगात – डॉ. समीर पालटेवार अटक.

 आमच्या खोट्या तक्रारी देणारा तिसरा खानदानी सकट बरबाद..

नागपूर (प्रतिनिधी मंगेश चोरे) :
नागपूर येथील नामवंत न्युरोलॉजिस्ट डॉ. समीर पालटेवार याला काल सीताबर्डी पोलिसांनी अखेर अटक केली. मागील तीन वर्षांपासून या भामट्याच्या कुकर्मांचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करून पर्दाफाश केला. याच कारणास्तव त्याने आमच्याच विरोधात खोट्या तक्रारी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सत्य दडपवणे त्याला शक्य झाले नाही.या प्रकरणाचा मूळ सूत्रधार असलेला डॉ. पालटेवार हा सुरुवातीला प्रामाणिक उद्योजक श्री. गणेश चक्करवार यांनी उघडलेल्या हॉस्पिटलवर डोळा ठेवून त्यावर कब्जा केला. शासनाच्या विविध योजनांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपये हडप केले. पुढे स्वतःच्या बायकोलाही भांडवलदारीत भागीदार केले, मुलाला डॉक्टर करून त्यालाही या चोरट्या धंद्यात सामील केले.याच्या दवाखान्यात मंगेश गोरंटीवार हा तोतया डॉक्टर म्हणून काम करत होता. पोलिसांची कॅप गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवून लोकांना फसवत होता. हे सर्वप्रथम आम्ही उघडकीस आणले. या टोळीने आमचाच गेम करण्याचा प्रयत्न केला; मात्र “बळी बकऱ्याचा जातो, वाघाचा नाही” या उक्तीप्रमाणे अखेर हे स्वतःच जाळ्यात अडकले.पालटेवारने अटकपूर्व जामिनासाठी अथक प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला. काल रात्री सीताबर्डी पोलिसांनी त्याला अटक केली. अटक झाल्यावर दुखण्याचे नाटक करत त्याला मेवो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हे नाटक फार काळ चालणार नाही. यावेळी त्याला जामीन मिळणे अशक्य असून किमान तीन महिने तरी कारागृहात काढावे लागणार आहेत.दरम्यान, त्याची पत्नी, मुलगा व इतर आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.पालटेवार पालथा झाला… आमच्या नादी लागला… पुरता बरबाद झाला.
प्रामाणिकाची दाबली इस्टेट… याची खानदानी झाली स्टेट!


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles