
बातमी येताच “हाफ समोसा” पत्रकाराचे सेटिंग सुरू!
बातमी येताच “हाफ समोसा” पत्रकाराचे सेटिंग सुरू!
हाच तो वर्धा येथील सेटिंग पत्रकार संजय ओझा उर्फ(हाफ समोसा)सावधान पैसे मागायला आला तर आम्हाला सांगा..
वर्धा (प्रतिनिधी) : वर्ध्यातील सर्वात मोठा सेटिंग मास्टर पत्रकार म्हणून कुप्रसिद्ध झालेला संजय ओझा उर्फ हाफ समोसा पुन्हा चर्चेत आला आहे. कोणताही पत्रकार एखादी धडक बातमी प्रकाशित करताच हा लगेच त्या प्रकरणात शिरून पैशांची देवाण-घेवाण करण्यास मागेपुढे पाहत नाही, असा त्याचा नित्यनेम झालेला आहे.बातमी प्रकाशित करण्यासाठी याचे रेट कॉलम सेंटीमीटरप्रमाणे ठरलेले असून, त्याशिवाय याला हाफ समोसा हवाच, अशीच सर्वत्र चर्चा आहे.आमच्या हाती आलेल्या अनेक पुराव्यांनुसार, याने पूर्वीही विविध ठिकाणी संपर्क साधून अनेकांकडून पैसे उकळले आहेत. नुकतीच एक बातमी प्रसिद्ध होताच हा थेट संबंधित दुकानात जाऊन पोहोचला. त्यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनीच त्याचा फोटो टिपला आणि हा पुन्हा “हाफ समोसा” या टोपणनावाने चर्चेत आला.मागील काळात याने एका म्हशी भद्र्याकडून आमच्या बातम्याही पैसे घेऊन छापल्या होत्या. त्या प्रकरणी सहा न्यायालयीन खटले दाखल आहेत. येत्या काळात या खटल्यांमध्ये त्याला सुटका मिळणे कठीणच दिसते.वर्ध्याच्या पत्रकारितेच्या इतिहासात अशा भुरट्या पत्रकारांनी संपूर्ण पत्रकार बांधवांना बदनाम केले आहे. त्यामुळे पत्रकारितेविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रम व अविश्वास निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.