
गिरीश राजपाल (उर्फ) बुकऱ्याची परिसरात दादागिरी
गिरीश राजपाल (उर्फ) बुकऱ्याची परिसरात दादागिरी

सरकारी जागेवर अतिक्रमण; शेजारी त्रस्त
वर्धा (प्रतिनिधी): शहरातील प्रसिद्ध डिझेल-पेट्रोल तस्कर म्हणून ओळखला जाणारा गिरीश राजपाल (उर्फ) बुकऱ्या याच्या दादागिरीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांनी सांगितले की, त्याने सरकारी जागेवर अनधिकृत शेड उभारले असून, जाण्या-येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण केला आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर सायकल देखील उभी करू देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.नागरिकांनी या संदर्भातील काही व्हिडिओ फुटेज आमच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून दिले असून, तत्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने याबाबत त्वरीत कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.