वर्षातील भामटीपुरा परिसरातून लाखोंच्या सुगंधी तंबाखूची उलाढाल, हवाला वाला हा सोनु कोण?

वर्षातील भामटीपुरा परिसरातून लाखोंच्या सुगंधी तंबाखूची उलाढाल, हवाला वाला हा सोनु कोण?

वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा शहरातील भामटीपुरा परिसरातून प्रतिदिन किमान वीस लाख रुपयांहून अधिक बनावट सुगंधित तंबाखूची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे लाखो रुपयांची रोज हवाला ची उलाढाल आणि दुसरीकडे बनावटी सुगंधित तंबाखू विकणारा हा सोनु तस्कर कोण? याची मात्र संबंधित विभागाला कानोकान खबर नसणे ही बाब पचवण्यासारखी नाही.वर्धा जिल्ह्यातील शेकडो लोकांना या कारभाराची खुली माहिती असताना संबंधित अधिकारी झोपेचे सोंग का घेत आहेत, हा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. जिल्ह्यातील अवैध डिझेल-पेट्रोलचा धंदा हल्ली जवळपास बंद झाला, मात्र जीवितास धोका निर्माण करणारा हा तंबाखूचा व्यवसाय कधी बंद होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.भामटीपुरा परिसरात सोनु तर वर्धा पोलिस ठाण्याच्या मागे शंकर — हे काय सरकारी जावई आहेत की काय? यांना मुभा कुणामुळे मिळते? असे अनेक प्रश्न आणि त्यामागोमाग उपप्रश्न हल्ली नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून विचारले जात आहेत.सदर प्रकरणी काही सामाजिक संघटना पुढाकार घेण्याच्या तयारीत असून, संबंधित हवाला वाला तसेच शंकर यांच्या या नकली सुगंधित तंबाखूच्या व्यवसायावर कारवाई करावी आणि त्याची विल्हेवाट लावावी, असे आवाहन करण्यात येत आहे.सदर तंबाखू भामटीपुरा परिसरातून विकली जाते, तर शंकर हा वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या मागून विक्री करतो, असे सूत्रांकडून समजते. यांचा माल ट्रकने येतो आणि शहरातील अनेक भागांत उतरवला जातो, असेही सांगितले जाते.

याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles